नाम. मुनगंटीवार यांचे 21 विकासकामे दाखविण्याचे आव्हान आम. प्रतिभा धानोरकर स्विकारणार काय

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14 एप्रिल) :- चंद्रपूर लोकसभेची निवडणूकीचा पारा चढतोय. भाजपा – कॉंग्रेसकडून मतदारांना साद घातली जातेय. या लोकसभेची निवडणूक आपण विकासावर लढवित असल्यांचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले. मुनगंटीवार यांनी आपल्या क्षेत्रात विकासाची अनेक कामे केली, हे त्यांचे विरोधही नाकारू शकत नाही, विकास हीच मुनगंटीवार यांची जमेची बाजू असल्यांने, त्यांनी याच मुद्यावर विरोधी उमेदवारांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपण विकासाची तीनशेहून अधिक कामे केली, कॉंग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांनी केलेले केवळ 21 कामे दाखवावी असे जाहीर आव्हान दिले. हे आव्हान देवून दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी, प्रतिभा धानोरकर यांचेकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. नाम. मुनगंटीवार यांचे आव्हान प्रतिभा धानोरकर का स्विकारीत नाही? असा प्रश्न आता मतदारांकडून विचारला जात आहे. धानोरकर दाम्पत्यानी विकास कामेच केली नाही तर आव्हान स्विकारतील असे? असा प्रश्न आता भाजप कार्यकर्त्याकडून केला जात आहे.

आमदार म्हणून पाच वर्ष, खासदार म्हणून साडेचार वर्ष असे साडेनऊ वर्षाचा मोठा कालखंड बाळू धानोरकर यांना मिळाला होता. यापैकी पाच वर्ष ते भाजपा—शिवसेना युतीच्या सरकारसोबत सत्तेत तर अडीच वर्ष खासदार म्हणून महाविकास आघाडीच्या सत्तेत होते. सत्तेत एवढा प्रदिर्घ काळ राहूनही त्यांना त्यांचे क्षेत्रात एकही चमकदार कामगीरी करता आली नाही, नेमके याच वर्मावर बोट ठेवत मुनगंटीवार यांनी धानोरकर यांचेवर निशाना साधला आहे.

आमदार प्रतिभा धानोरकर यांनाही अडीच वर्ष सत्तेतील आघाडीसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्या साडेचार वर्ष आमदार म्हणून वरोरा—भद्रावतीचे प्रतिनिधीत्व करीत आहे, मात्र त्यांचेकडेही सांगण्यासारखे काहीच काम नसल्यांने, मुनगंटीवार यांनी त्यांना किमान 21 विकास कामे दाखवावी असे जाहीर आव्हान दिले.

एककडे मुनगंटीवार विकास कामे सांगत मते मागीत आहेत, तर दुसरीकडे समाजमाध्यमांवर धानोरकर यांचे कुटूंबियांनी 1 दारू दुकानाचे 17 दारू दुकाने कसे झालीत? असा प्रश्न विचारीत आहेत. आमदार—खासदार झाल्यानंतर, विकासाची कामे करतांना सत्तेत नसल्याची अडचण येते तर दारू दुकानांची संख्या वाढवितांना ही अडचण येत नाही काय? असाही प्रश्न समाजमाध्यमांवर विचारला जात आहे. धानोरकर दाम्पत्यांनी 1 दारूचे दुकानाचे 17 केले, आता निवडूण आले तर 70 करतील असा उपरोधीक टोलाही ट्रोलधारक करीत आहे.

मुनगंटीवार यांचे विकासाचे आव्हान धानोरकर स्विकारतील काय? या प्रश्नाचे उत्तराची मतदारांना प्रतिक्षा आहे.