🔹दोन्ही तालुक्यातील तहसीलदार महसूल विभाग अधिकारी निद्रावस्थेत
🔸लाखो रुपयांचा महसूल पाण्यात
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.5 मार्च) :- शेगाव बू हे गाव वरोरा भद्रावती तालुक्यात असलेले अनेक गावं हे शेगाव शि स्वलग्न आहेत तेव्हा रामदेगी इरई नदी , वायगाव , आष्टा, परोधी , चंदनखेडा इरई नदीच्या पात्रातून सर्रास पणे वाळूची चोरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे तेव्हा भद्रावती वरोरा येथील तहसीलदार महोदय तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांचे दुर्लक्ष कसे काय ? असा प्रश्न सर्व नागरिकांना पडत आहे.
सविस्तर असे की.
बांधकाम व शहरीकरणासाठी रेतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने यासाठी रेती कुठूनही रात्री तस्कर उत्खनन करत असतात, सोन्याची खान असलेली भद्रावती तालुक्यातील, चंदनखेडा,पारोधी, बोरगाव धांडे ,आष्टा तर वरोरा तालुक्यातील चारगाव, वायगाव, अर्जुनी येथुन रात्रीच्या कर्कश आवाजात नागरिकांची झोप उडवत शेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात आहे याकडे महसूल विभाग भद्रावती, वरोरा, याचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
रेती तस्करांनी अवैध धंदे करण्यासाठी नदी पात्रता आपले वाहने उभी करून तसेच आपल्या नातेवाईक खेमजई गावातील कमी किमतीमध्ये शेतीसाठी घेतलेले ट्रॅक्टर शेतीचे कामासाठी न वापरता अवैध रेतीसाठी भाड्याने आणून रात्रीच्या अवैध रेती उपसा सुरू केलेला आहे, रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजात शेगाव तसेच परिसरात अवैधरित्या रेती व मुरूम सुरू असून काही उदासीन अधिकाऱ्यांच्या चुकीने परिसरातील नदी,नाले व छोटे पाटबंधारे यातून अवैद्य रेतीचा उपसा चार ते पाच ट्रॅक्टरच्या सहाय्याने केला जात आहे यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसूला चुना लागत आहे.
शेगाव व परिसरात अनेक दिवसांपासून शेकडो नवीन घर बांधकाम, दुकानगाळे, बांधकाम सुरू आहे यासाठी लागणारी रेती व भरना करण्यासाठी लागणारा मुरूम याची सर्रासपणे चोरी होत असून रात्री 10 ते पहाटे पाच वाजेपर्यंत जेसीपी व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात आहे.
शासन निर्णयाप्रमाणे रेती उपसा सूर्योदय आदी सूर्योदय नंतर करता येत नाही परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत रेती तस्कर भद्रावती,वरोरा तालुक्यातील चंदनखेडा,पारधी, बोरगाव धांडे,आष्टा, किनारा,सोनेगाव,कोकेवाडा, धानोली, दादापूर,वडाळा, साखरा,आब,वडगाव,वायगाव, अर्जुनी,निमडला परिसर,रस्ता चौकी घाट,मोडका पुलिया,परिसरातील छोटे नदी नाले इथून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक करीत आहे तसेच जिथे तिथे जंगला लगत छोटे नदी नाले याच्यावर बांधलेले बंधारे, या ठिकाणी पावसामुळे वाहून आलेले रेती खुलेआम रेती चोरी करणे सुरू आहे.
हा संपूर्ण भाग ताडोबा जंगल लगत असल्यामुळे रात्रीच्या सुमारास नाल्यामध्ये अधिवास करणारे वन्यप्राणी यांना मात्र ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजापासून त्यांच्या जीवनातील अतिवासापासून वंचित राहावे लागते तसेच रात्रीच्या सुमारास निशाचर प्राणी यांच्या दिनचर्यावर परिणाम होत आहेत त्यामुळे वाईलड लाइफ अस्ताव्यस्त होऊन शेत शिवारात भटकत आहे, एवढेच नाही तर रात्रीच्या सुमारास जंगली वन्य प्राण्यांची शिकार होण्याची घटना जास्त बडावली आहे.