पंचायत समिती कार्यालय वरोरा येथे HIMWP समन्वय कार्यशाळा सपन्न

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.4 मार्च) :- मा.आयुक्त,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अॅक्सिस बँक फाउंडेशन व भारत रुलर लाईव्हलिहूड फाउंडेशन (BRLF) आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कार्यालय वरोरा येथे मा.गट विकास अधिकारी गजानन आशा मुंडकर सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व लाईन डिपार्टमेंट यांची समन्वय कार्यशाळा दिनांक 1 मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेसाठी सर्व संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी,सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोहयो,कृषी विभाग, ग्रामसेवक,रोजगार सेवक,वन विभाग,जलसंधारण विभाग,इत्यादी विभागाचे अधिकारी व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था चे प्रकल्प व्यवस्थापक मा. रोशन मानकर सर व भारत रुरल लाईव्हलिहूड फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक सतीश माकोडे सर यांची उपस्थिती होती.सदर बैठकी मध्ये रोशन मानकर सर तालूका समन्वयक दीक्षांत राऊत सर आणि सतीश माकोडे यांनी प्रकल्पाचे पीपीटी च्या माध्यमातून सादरीकरण करून माहिती दिली. हाय इम्फट मेघा वाटर शेड प्रकल्प समन्वयातून पाच वर्षे राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश रोहयो अंतर्गत भूपृष्ठावरील सिंचन सुधारणे,भूजल पुनर्भरण वाढवणे,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि ग्रामीण आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारने असून, गाव पातळीवर रोहयोची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध विभागामार्फत योजना राबविल्या जातात याचा समन्वय साधने आहे.त्याच बरोबर पंचायत समिती च्या नंदादीप योजना स्पर्धे मध्ये वरोरा येथील पाच गावाची निवळ करण्यात आली आहे.

वायगाव भोयर,भटाळा,खेमजई,आबमक्ता, महालगाव या गावचे शिवार फेरी नियोजन करून त्यावर कार्य करणे त्याच बरोबर प्रत्येक हाताला काम व प्रत्येक शेतीला पाणी या अंतर्गत सिचन विहीर चे नियोजन करण्यात आले व त्यावर चर्चा करण्यात आली,नंतर विस्तार अधिकारी (प.वि.)प्रवीण बक्षी सर यांच्या अभिभासनाने कार्यक्रम चि सांगतात करण्यात आली .

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बोगेकर मॅडम APO प.स.,भैसारे सर APO प. स. व KVGPS प्रकल्प टीम वरोरा,सुनील बावणे,प्रबुद्ध डोये,श्रीपत पाटील,मंगेश तुमसरे, विशाल आडे,अंकुश रामपुरे,गुरूदास चौधरी,नीलिमा वनकर, माया पोहीणकर,आचल घोडमारे,पल्लवी नन्नावरे,यांनी सहकार्य केले.