दिव्यांगाना ५ टक्के निधि त्वरित अदा करा….प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांची मागणी

Share News

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15 फेब्रुवारी) :- दिव्यांगाना ५ टक्के निधि त्वरित अदा करण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.चिमूर तालुक्यातील काही ग्रामपंचायत आहे की?दिव्यांगाचा ५ टक्के निधि अखर्चित ठेवतात.तर ग्रामपंचायत ने अपंग निधी अखर्चित ठेऊ नये यासाठी पंचायत समिती स्तरावरुन तात्काळ आदेश देऊन ग्रामपंचायत दिव्यांगाना ५ टक्के निधि त्वरित उदा करण्यात यावे असे आदेश द्या.अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष चिमूर च्या वतीने पंचायत समिती कार्यालय चढून विरुगिरिने आंदोलन करण्यात येईल.

जर पंचायत समिती स्तरावरुन दिव्यांगाना ५ टक्के निधि वितरीत करण्याचे आदेश ग्रामपंचायतना दिल्या नंतर ग्रामपंचायत यांनी अपंगांचा ५ टक्के निधि त्वरित वितरित नाही केला तर ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्ची टेबल जाळण्यात येईल असा इशारा प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे , प्रहार सेवक देवीदास सहारे यांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला .

Share News

More From Author

राज्यस्तरीय प्रेरणा शिबिरासाठी चंद्रपूर जिल्यातून निकिता ची निवड

भारतीय लोकशाही धोक्यात असून, लोक उघडपणे बोलायला घाबरत आहे…प्रा. श्याम मानव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *