🔸प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांचे तहसीलदारिना निवेदन
✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चिमूर(दि.13 फेब्रुवारी) :- सतत दोन दिवस चिमूर तालुक्यात गारपीट वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.तालुक्यात काही भागात जोरदार तर काही तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सतत तालुक्यात दोन दिवस झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा,तूर, गहू, वाटाणा,लाखोळी, उडीद,मुंग,मका,मिरची व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी या नव्याने आलेल्या अस्मानी संकटामुळे हवालदिल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांनी निवेदनातून तहसीलदार यांना केली आहे.