चारगाव शेगाव शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.. ईश्वर नरड

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.12 फेब्रुवारी) :- गेल्या दोन दिवसापासून या परिसरातील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तसेच जोरदार झालेल्या गारपीट मुळे अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी हा आर्थिक संकटात सापडल आहे.

शेतात मोठ्या दिमाखदारीने उभे असलेले पीक हाती आलेले पीक काही क्षणात पूर्णतः नष्ट झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक तसेच कर्जाचे डोंगर न झेपवण्या सारखे झाले आहे . त्यामुळे या परिसरातील तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करू सर्वे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ त्यांचा मोबदला देण्यात यावा. या सोबत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनचे कर्ज देखील माफ करण्यात यावे अशी मागणी युवा शेतकरी तसेच भाजपा पक्षाचे युवा कार्यकर्ते श्री ईश्वर नरड यांनी केली आहे.

   सविस्तर असे की वरोरा तालुक्यात व शेगाव बु परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट सह वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला काढणीला आलेला चना ,गहू, ज्वारी ,जवस यासारख्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे व शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडलेला आहे .

त्याचप्रमाणे सोयाबिनला आलेला येलो मोजाक शेतकऱ्यांचे नुकसान करून गेला व त्यात सोयाबीन आणि कापसाला भाव नाही .आता तर हात आलेलं पीक अवकाळी पावसाने नुकसान करून गेले शेतकरी वर्ग हा दुहेरी संकटात सापडला आहे शासनाने तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व पिक विमा मंजूर करावा.