🔸रवींद्र तिराणिक यांची बापू कुटीला भेट
🔹बापू कुटीत बसून चालवला चरखा केले चिंतन
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.31 जानेवारी) :- अहिंसा हे दुर्बुलाचे नव्हे तर बलवानाचे शस्त्र आहे. भारत देशाचे खरे उज्वल स्वप्न खेड्यात बघणाऱ्या ग्राम उद्योगाची संकल्पना संपूर्ण देशाला कृतीत उतरवून संपूर्ण जीवनाचे सार सांगणाऱ्या अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता बापू यांच्या वर्धा जिल्ह्यातील कुटीला गांधी विचार सरणीतील समाज हितकारक लोक प्रश्न संदर्भात प्राणांतिक आत्मकलेश उपोषण करणारे , गेल्या दशकातील अण्णांच्या सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख तथा जनमंच सदस्य ,कलाअकादमीचे संचालक रवींद्र तिराणिक यांनी बापू कुटीला पुण्यतिथी दिनानिमित्त भेट देत चरख्यावर बसून सूतकातीत आदर्श जीवन संरचना जाणून घेत बापूला विनम्र अभिवादन केले.
आजचा युवक नाना विविधतेने निराश होऊन हताश होत व्यसनाधीनतेने भरकटलेला दिसतोय. हे भारत देशाच्या दृष्टीने प्रगतीचे लक्षण नाही .विविध प्रश्न हिंसेने नव्हे तर अहिंसेने सुटतात हा विचार सध्याच्या युगात आजच्या युवकांनी अंगीकृत केला पाहिजे. तरच आधुनिक भारताचे स्वप्न पूर्ण करता येईल. असे विचार मंथन बापू कुटीत बसून केले. प्रसंगी अनेक सामाजिक चळवळीतील विविध स्तरावरील कार्यकर्ते विनम्र अभिवादन करण्याकरता बापू कुटीत आले होते. सोबत समीर आसुटकर, वासुदेव शेंडे सहकारी म्हणून उपस्थित होते.