शेतात जाण्यासाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

🔹वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकाची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.29 जानेवारी) :- भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथे मागील एक महिन्यापासून चिरादेवी शेत शिवारात वाघाचा दिवसा ढवळ्या वावर असून शेतकरी शेतमजूरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शेतीचे कामे युद्धपातळीवर सुरू असून शेतकरी शेतामध्ये जाण्यास धजावत नाही.

मंजूरांनी सुद्धा शेतीच्या कामाकडे पाठ फिरवली आहे. चिरादेवी या गावात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्याचसोबत शेळीपालन व्यवसाय सुद्धा बऱ्यापैकी आहे. शेतकऱ्यांंना जनावरे व बकरी चारण्यासाठी लोकांना पडीत जमीन व जंगलाचा आधार घ्यावा लागतो. परंतु नेमक्या त्याच ठिकाणी वाघाचा वावर आहे. त्यामुळे गुराख्याला गुरे चारण्यासाठी जावं कि नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसापूर्वी चिरादेवी येथील शेतकरी प्रकाश आत्राम यांची कालवड सुद्धा वाघाने फस्त केली आहे.

त्याचदरम्यान गोरजा येथील २ बकऱ्या मारल्या. हि गोष्ट ताजी असताना काल रविवारी सांयकाळच्या सुमारास शेतकरी विठ्ठल उपरे घराकडे गुरे घेऊन जात असताना त्यांच्यावर हमला केला. परंतु त्यांनी सावधगिरी बाळगल्याने थोडक्यात बचावले आहे. तसेच दिवसेंदिवस हमले होत राहीले आणि दुधाळ जणांवरावर वाघांनी हमला केला तर त्या शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत येईल. आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये भिस्ती झाली आहे. चिरादेवी, गवराळा, गोरजा येथील शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतकाम करावी लागतं. वनविभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावी, अशी मागणी चिरादेवी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

 स्टेटमेंट :- मागील एक महिण्यापासून चिरादेवी शेत शिवारात वाघाची दहशत सुरू आहे. रोज जनावरांवर हमले होत आहे. काल रविवारी सायंकाळी घराकडे गुरे घेऊन जात असताना वाघांनी माझ्यावर हमला केला. मी सावधगिरी बाळगल्याने थोडक्यात बचावले. चार – पाच शेतकऱ्यांनी त्याला हुसकावून लावले. असे हमले होत राहिले तर आम्ही जनावरे चारायचे कसे? वनविभागाने याकडे लक्ष देऊन वाघाचा बंदोबस्त करावा.. 

                 विठ्ठल उपरे – गुराखी चिरादेवी