🔸25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजन
✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.28 जानेवारी) :- महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे राज्यशास्त्र विभाग आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुटे व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. रंजना लाड यांनी यांनी स्पर्धेचे आयोजन केले. त्या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगळापुरे व नायब तहसीलदार काळे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेला एकूण चौप्पन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या स्पर्धेत प्रथम कु. दीपाली प्रजापती द्वितीय ऐश्वऱ्या आत्राम व समीक्षा गजभे, तृतीय प्राजक्ता मिलमीले व धनश्री होरे प्रोत्साहनपर हर्षदा ठोंबरे,समृद्धी बुरानकर,निकिता कापसे,वैष्णवी घुमे,प्रिया दाताळकर,कांचन बल्की स्पर्धेत विजेते ठरले.परीक्षक प्रा. प्रियंका बुकीया प्रा. कल्याणी आत्राम होते यावेळी मतदान दूत शुभम आमने यांचे देखील सहकार्य लाभले.