✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि .23 जानेवारी) :- अदानी कौशल विकास केंद्र चांदा सिमेंट वर्क द्वारा आयोजित तीन दिवसीय रोजगार मेळावा आणि करियर मार्गदर्शनचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. पियुष मेश्राम सर (विभाग प्रमुख व प्लेसमेंट ऑफिसर, जनता महाविद्यालय,चंद्रपूर) अतिथी म्हणून उपस्थित होते सोबतच डॉ राकेश चव्हाण सर (हिंदी विभाग प्रमुख, जनता महाविद्यालय) आणि शुभांगी नगराळे मॅडम (सेंटर प्रमुख- अदानी कौशल्य विकास केंद्र चांदा)आणि हे मार्गदर्शक कार्यक्रम उपस्थित होते.
तीन दिवसीय रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील 350च्या वर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच ऑनलाईन पध्दतीने 200 च्या वर विद्यार्थ्यांचे मुलाखती घेण्यात आल्या.
रोजगार मेळाव्याच्या यशस्वी करण्यासाठी शुभांगी नगराळे (सेंटर प्रमुख- अदानी कौशल्य विकास केंद्र चांदा), हितेश डोर्लीकर (एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग), अमित उईके(ट्रेनर), सुमित दहीकर, श्री नंदकुमार ढेगंणे(जेष्ठ नागरिक संघ, घुगुस) व इतर सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.