🔸अवैध वाळू उत्खनन व वाहतूक, अवैध गौण खनिज उत्खनन, सट्टा पट्टी, अवैध दारू विक्री व गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.6 जानेवारी) :- वरोरा भद्रावती परिसरातील अवैध धंदेवाले व गुंडांचा पर्दाफाश करणारे आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी यांची जालना येथे बदली झाल्यानंतर येथे कोणता पोलीस अधिकारी येणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले होते, साटम यांनी पदभार स्वीकारला आहे. १९ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत मंगळवेढा येथे पोलीस निरीक्षक म्हणून प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले.
आयपीएस नयोमी साटम या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रहिवासी असून सध्या मुंबईत स्थायिक आहेत. वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांना मिळालेली जबाबदारी आव्हानात्मक आहे हे खरे असले तरी त्यांनी आपल्या कर्तव्याचा व अधिकाराचा योग्य वापर करून गुन्हेगारांवर कायद्याची योग्य अंमलबजावणी केली तर सर्वसामान्यांना नक्कीच न्याय मिळेल अशी आशा आहे. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक, अवैध गौण खनिज उत्खनन, सट्टा पट्टी, अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान ते कसे पेलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.