✒️ आम्रपाली गाठले शेगाव बु (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बु (दि.27 डिसेंबर) :- कवितेचे घर तसेच विकास ग्रुप शेगाँव बुद्रूक ता वरोरा जिल्हा चंद्रपूर ह्यानी कवितेचे घर शेगाँव बुद्रूक येथे प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब ह्यांची प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब ह्यांची 126 वी जयंती 27 डिसेंबरला साजरी केली.
ह्या निमित्ताने शेगाँव बुद्रूक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्यावेळी शाळेतील विद्यार्थी तृषा किशोर कांमडी, निधा उमेश नंदनवार, शिवम प्रविण भिलकर, किमया दिपक नरड, हिंदवी राजू राऊत ह्यांनी मिर्झा गालिब ह्यांच्या साहित्य कृतीवर तसेच त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कवी श्रीकांत पेटकर ह्यानी शाळेतील विद्यार्थ्यांना लहान मुलासाठी असलेले पुस्तके जिल्हा परिषद शाळेसाठी भेट दिली.
लहान मुलांना साहित्याची गोडी लागावी ह्या उद्देशाने भविष्यात सुद्धा असेच शाळेत पुस्तकाचे वाटप करण्यात येईल असे त्यांनी ह्यावेळी सांगितले.
तसेच कवितेच्या घरी साहित्यिकांचे कार्यक्रम घेऊन साहित्यिकांची ओळख लहान मुलांना व्हावा हा सुद्धा उद्देश त्यांनी सांगितला.
ह्यावेळी आत्माराम खैरे माजी प्राचार्य, शासकीय आश्रम शाळा देवाळा, राजूरा ह्यांची ह्यावेळी विशेष उपस्थिती होती.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ज्योत्स्ना पाटील, भारती टापरे, कवितेच्या घराचे संकल्पनाकार किशोर पेटकर, रजनी रामटेके, भारत रामटेके, संदीप भे ले, प्रा प्रमोद ना रा य ने, सूर्यकांत पाटील ह्यानी विशेष सहकार्य केले.