सत्ताधारी -विरोधी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यावर बोला आश्वासनांचे पाऊस नको तर शेतकऱ्यांना अनुदान द्या…शेतकरी नेते विनोद उमरे

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.12 डिसेंबर) :- सर्वसामान्यांच्या मानगुटीवर महागाईचे भूत बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.मात्र याबाबत लोकप्रतिनिधी,विरोधी पक्ष चिडीचूप असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे महागाईवर राजकारण्यांची हाताची घडी अन् तोंडावर बोट असे चित्र आहे.सत्तेच्या सारिपाटावर आव्हार प्रति आव्हाराच्या लढाईत शेतकरी,शेतमजूर सर्वसामान्य प्रश्न कोणीच बोलतानी दिसत नाही.गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.पेट्रोल-पेक्षाही अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही महाग होत आहेत.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव इतके वाढले आहेत की,त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जीवन जगणे कठीण झाले आहे.परंतु याबाबत कोणताही राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी अजिबात आवाज उठवण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्य जनतेच्या समस्या कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र सध्या राजकारण म्हटल्यावर लोक तोंडावर बोट आणि हाताची घडी करताना दिसतात.मात्र हीच परिस्थिती राजकारण्यांवर आली आहे.सत्तांतरणानंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

प्रत्येक पक्ष नेता आपापली भाषा बोलू लागला आहे.या कुरघोड्या मध्ये शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कडे दुर्लक्ष करत आहे.लोकप्रतिनिधी फक्त राजकारण करतात समाज कारण नाही.राजकीय नेते म्हणतात आम्ही जनतेचे सेवक असून आम्ही फक्त २० टक्के राजकारण करतो आणि ८०टक्के सामाजकारण आजची दुषित राजकारण पाहता राजकारण आणि समाजकारण यांची दिशा उल्टी झाली आहे.

तरी ८०टक्के राजकारण व २० टक्के समाजकारण करतात राजकारण आणि राजकारणी यांच्या शिवाय देशाचा कारभार व्यवस्थित चालू शकत नाही हे खरे आहे.त्यामुळेच कोणत्याही राजकीय प्रणालीत राजकीय लोकांन साधारण महत्त्व असते.त्यामुळे जगात राजकारणी लोकांविषयी सर्वसामान्य परंतु राजकीय देशातील सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण समस्या आणि अडचणी सोडविण्यासाठी झालेली असते.

ही गोष्ट मात्र आपल्या देशातील राजकारणी लोकप्रतिनिधी विसरलेले आहे काय?त्यामुळे शेतकरी,शेतमजूर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना कडे दुर्लक्ष झाले आहे.कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. सोयाबीन पीक हातुन निघुन गेले आहेत.

प्रत्येक पक्ष नेता आप आपली भाषा बोलू लागला आहे. यामध्ये शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कडे दुर्लक्ष करत आहे.लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या समस्यावर बोला आश्वासनाचा पाऊस न नको तर शेतकऱ्यांना अनुदान द्या.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असाच एक आश्वासन दिले होते की,महात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान ३१ मार्च २०२३ पर्यंत देऊ असे आश्वासन राज्य सरकार यांनी दिले होते.मात्र आता तर साल २०२४ यायला लागले आहे तरी प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना काही मिळाले नाही.त्यापेक्षा आश्वासनाचा पाऊस नको तर अनुदान द्या.शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे.