आपल्या हक्काच्या धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्च्यात मोठ्या संख्येने सामील व्हा….महेश नाईक

Share News

✒️ गजानन लांडगे महागाव (Yavtmal प्रतिनिधी)

महागाव (दि.11 डिसेंबर) :- भारतीय संविधानाच्या अनुसूचित जमातीच्या सुचीमध्ये धनगर ही जात अनुक्रमांक ३६ वर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं अनुसूचित जमातीच आरक्षण भारतीय संविधानात दिलं आहे.पण आद्याप त्याची अंमलबजावणी कोणत्याही सरकारने केली नाही.

हे आपल्या हक्काचं आरक्षण मिळविण्यासाठी व त्याची एस.टी प्रवर्गाची अंमलबजवणी सरकार कडून करून घेण्यासाठी धनगर समाजाचा भव्य मोर्चा विधान भवन ,नागपूर येथे ११डिसेंबर ला धडकणार आहे. या मोर्चाचे आयोजन सकल धनगर समाज,महाराष्ट्र राज्य च्यावतीने केले असून,यात आपल्या सर्वांना सहभागी व्ह्याचे आहे,असे आव्हान धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेश उपध्यक्ष महेश नाईक यांनी केले. ते पुसद तालुक्यातील बेलोरा येथे झालेल्या धनगर समाजाच्या सभेत बोलत होते.

अनुसूचित जमातीच्या अमलबजावनीसाठी गेल्या काही दिवसात धनगर बांधवांनी राज्यात अनेक ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली, चौडी येथे १३ दिवसाचे आमरण उपोषण झाले.पण सरकारने दखल घेतली नाही.

इतरत्र होणाऱ्या आमरण उपोषणाला स्वतः भेट देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या उपोषणाची साधी दखलही घेऊ नये ही शोकांतिका असून ,हाच का आपला सामाजिक न्याय असा सवालही नाईक यांनी केला.धनगर समाजाच्या संयमाचा चुकीचा अर्थ सरकारने काढू नये.याबाबत समाजात सरकार प्रती आत्यंतिक रोष असून धनगर समाजाचे वादळ उठल्यास सरकारला ते रोखणे शक्य होणार नाही,आसा इशारा ही नाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.

आता समाजाने स्वस्थ बसून चालणार नाही आपल्या हक्काचं आरक्षण मिळून घेण्यासाठी सरकारला ताकत दाखवावी लागेल,त्यासाठी लाखोच्या संख्येने आपल्याला मोर्चात सामील व्हायचे आहे ,आशी हाक महेश नाईक यांनी धनगर समाजाला घातली.त्यांनी बेलोर सह मारवाडी,आमटी,कुंभरी,मोप,हीवळणी, फेट्रा, लिंबी ,गाजीपुर, शेलू, जांमबाजार,वेणी, गौळ आदी पुसद तालुक्यातील गावांमध्ये समाजाच्या बैठकी घेऊन मोर्चाची माहिती दिली.

यावेळी त्यांच्या सोबत समाजाचे नेते सुरेश गोफने सर,शिवदास बिडकर,सुभाषराव बोडखे,अशोकराव नाईक,विनोदराव सरगर,पांडुरंग कवाणे,नारायणराव पाटील मुडानकर ,हरिभाऊ खरात, पुंजाराव जामकर,माणिक मरकड, डॉ.संजय मारकड,कैलाश गावणर,राजेंद्र महाले,कृष्णा पावडे ,सचिन सरगर आदी समाजातील गणमान्य नेते उपस्थित होते.

Share News

More From Author

शेवटच्या माणसाचा उदय हाच ‘विकसित भारत संकल्प यात्रेचा’ संकल्प

वाहनाच्या धडकेने वाघिणीचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *