वरोरा चिमूर महामार्ग पूर्ततेसाठी होणार 11 तारखेला प्रहार चे जन आक्रोश चक्काजाम आंदोलन

Share News

🔹आंदोलनला विद्यार्थी, शिक्षक , नागरिक यांचे मोठ्या प्रमाणात समर्थन 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि .9 डिसेंबर) :- गेल्या ५ वर्षात अनेक निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या रोड बांधकाम करणाऱ्या कंपनीला देण्यात आले तरी या कंपनी प्रशासनला जाग कशी येत नाही असा प्रश्न या रोड नी ये जा करणाऱ्या नागरिकांना पडतो. या महामार्गावर नेहमी अपघाताचे सत्र चालूच असते त्याला कारण बनलेला अर्धवट रस्ता, पूल आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिनिधी या महामार्गा संदर्भात आपला मुद्दा सरकार ला का मनून मंडत नसेल की लोकप्रतिनिधी ला कंपनी प्रशासन चिरी मिरी देऊन गप्प ठेवत असेल असा प्रश्न नागरिक करत आहे.

     दोन दिवसाआधी गिरोला या गावातील नागरिकाचा या रोड वर अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला वारंवार हे अपघाताचे सत्र कधीपर्यंत चालू राहणार याचा जॉब विचारण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षा च्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे .

या आंदोलनात शाळकरी मुले हे सुद्धा उपस्तिथ राहणार आहे अशी माहित प्रसारमाध्यमाशी बोलताना प्रहार चे जिल्हा अध्यक्ष शेरखान पठाण यांनी दिली आहे. त्याकरिता चिमूर वरोरा महामार्गावरील राळेगाव येथे येत्या 11 तारखेला प्रहारचे जन आक्रोश चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे यात गावातील तसेच गाव परिसरातील अनेक नागरिक विद्यार्थी शिक्षक हे समर्थन देत या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचे शेरखान पठाण यांनी सांगितले ..

यावेळी राळेगाव येथील सरपंच पुंडलिक नन्नवरे, सौ. सुरेखा घाटे उपसरपंच. सचिन डूडुरे , रवींद्र थूल ग्राम पंचायत सदस्य, वैशाली अरुण नैताम , छाया पत्रू नंनवरे, नथुजी गारघाटे, संजय दडमल , भाऊराव नन्नवरे, सूरज दोहतरे , गणेश जांभुळे, नारायण नैताम , संभाजी कांबळे , गजानन नैताम , रमेश मत्ते , सुरेश जंभुळे , शंकर चौधरी , तंटा मुक्त समिती अध्यक्ष श्री बलचद्र थूल , व तसेच सर्व गावातील नागरिकांचे समर्थन व सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

Share News

More From Author

९ डिसेंबर आजचे दिनविशेष

10 डिसेंबर आजचे दिनविशेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *