चंद्रपूर येथे ध्वजदिन तथा जिल्ह्यातील माजी सैनिकांचा मेळावा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.7 डिसेंबर) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चंद्रपूर तर्फे जिल्हा नियोजन भवन येथे ध्वज दिन तथा जिल्ह्यातील माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशीळ उपजिल्हाधिकारी संजय पवार,जिल्हा न्यायाधीश सुमित जोशी, विपिन पालीवार,कॅप्टन दीपक लिमसे, किशोर हेमके, विजय तेलरांधे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सैनिकांच्या जिल्हा मेळाव्यात 1971 साली झालेल्या युद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या माजी सैनिक पांडुरंग हेमके, नवराते व श्याम तिरसुळे या माजी सैनिकांचा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम अमर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी उपस्थित मेळाव्याला मार्गदर्शन केले.

यावेळी तीन युद्धात सहभागी झालेले भद्रावती येथील जिल्ह्यातील एकमेव माजी सैनिक पांडुरंग हेमके यांच्याशी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी संवाद साधून युद्धातील आठवणी त्यांच्याकडून जाणून घेतल्या.यावेळी माजी सैनिक पांडुरंग हेमके यांनी युद्धातील आठवणींना उजिळा दिला.सदर मेळाव्याला जिल्ह्यातील 38 माजी सैनिकासह इतर नागरिक उपस्थित होते.