तरुण पीडीने व्यसनाच्या आहारी न जाता खेळांकडे वळण्याची गरज… मुकेश जिवतोडे 

🔸पावना येथे तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचा थाटात उदघाटन 

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर(दि .5 डिसेंबर) :- तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. त्यामुळे त्यांना चुकीच्या मार्गाने न जाऊ देता वेळीच थांबवणे काळाची गरज आहे. होतकरू तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य तर अंधारात ढकलतातच आणि त्याबरोबर एक उज्ज्वल भविष्याचे स्वप्नदेखील विरून जाते.त्यामुळे तरुण पीडीने व्यसनाच्या आहारी न जाता खेळांकडे वळून व्यायामाच्या माध्यमातून शरीर सुदृढ ठेवावे असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केले.छत्रपती क्रीडा मंडळ पावना (रै) येथे आयोजित भव्य पुरुष कबड्डी सामन्याच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

तालुक्यातील पावना (रै) छत्रपती क्रीडा मंडळ येथे २ दिवसीय भव्य पुरुष कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. याचा उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. या उदघाटन कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तीथी दर्शविली होती. याप्रसंगी खेळाळूचा परिचय करून घेत उपस्तिथ ग्रामस्थ तथा खेळाळून जिवतोडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच एकनाथ घागी, शिवसेना (उबाठा ) उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड,विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, युवासेना जिल्हासमन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर, युवासेना उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अक्षय ताजने, विशाल सावसाकडे, भावराव घागी व आदी मान्यवर उपस्तिथ होते.