🔸चिमूर वरोरा हायवे च्या कामासाठी घेतला आक्रमक पवित्रा
✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.2 डिसेंबर) :- वरोरा चिमूर महामार्ग ३५३ ई चे काम एस. आर. के. नामक कंपनी ला देण्यात आले होते. पण हे काम मागील ७ वर्षां पासून अतिशय कासव गतीने सुरू आहे. काही ठिकाणी अर्धवट स्वरूपाचे पूल तर काही ठिकाणी मोठं मोठाले जीवघेणे खड्डे. कुठे खोदकाम करुन कुठलेही सावधान करणाऱ्या सूचना फकल लावलेले नाही. तर भेंडाला येथे कारण नसताना मागील १० महिन्या पासून रोड वर कुठलेही सूचना फलक न लावता मशीन उभी केली आहे. तसेच या रोड च्या कामामुळे मागील कित्तेक वर्षा पासून उडणाऱ्या धुळी मुळे शेतकरी यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.
तसेच शेगाव मधील नागरिक तथा परिसरातील नागरिक यांना स्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीच्या या चुकीच्या नियोजनमुळे कित्येक लोकांना आपला जिव गमवावा लागला आहे. तसेच काहींना कायम स्वरूपी अपंगत्व आले आहे. रोड वरून दररोज ये जा करणाऱ्या प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, तसेच नागरिकांना मानेचा तसेच कमरेचा त्रास सुरू झाला आहे.
या बाबत विविध संगठनाणी निवेदन देऊन सुद्धा काहीही उपयोग झाला नाही .लोकप्रतिनिधी यांनी आज पर्यंत या कडे कुठलीही उपाययोजना केली नाही अथवा प्रशासनाने सुद्धा कुठलेच कठोर पाऊल उचलले नाही त्या मुळे या मुजोर एस. आर. के. कंपनी विरुद्ध व झोपलेल्ल्या लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाला जागे करण्यासाठी शेगाव येथील गावकारी तथा परिसरातील नागरिक यांनी आता कठोर भूमिका घेत येत्या ८ दिवसात रोड च्या कामाला सुरुवात न झाल्यास संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या साहाय्याने शेगाव बु येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी ही सर्वस्वी प्रशासनाची राहील असे निवेदन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, रस्ते वाहतूक मंत्री, तहसीलदार व स्थानिक पोलीस स्टेशन यांना दिले आहे.