✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.22 नोव्हेंबर) :- निवडणुकीच्या काळात राजकीय नेते जनतेला कोणते आश्वासन देतील हे सांगता येत नाही. आश्वासनाच्या जोराव निवडणुका जिंकल्या जातात आणि एकदा निवडून आले की मग मात्र आश्वासनांना राजकीय नेते विसरून जातात.
भारतात लोकशाही आहे.अनेक राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत असतात.त्यातील काही प्रमुख राजकीय पक्षांना सत्ता प्राप्त होते.हे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी जनतेसमोर जाताना प्रत्यक्षात न उतरणारी अनेक आश्वासने जनतेला देत असतात.जनता ही अनेकदा या आश्वासनावर भाळून राजकीय पक्षांना मतदान करीत असते.
भारतात लोकांचा राजकीय नेत्यांवर फार विश्वास असतो.त्यामुळे आपल्या नेत्याने दिलेले आश्वासन तो नक्की पूर्ण करणार असे सर्वसामान्य साध्या-भोळ्या जनतेला वाटते आणि लोक डोळे बंद करून आपल्या नेत्यावर विश्वास टाकतात व त्यांच्या पक्षांना मतदान करतात.त्यामुळे नेते सुद्धा जनतेला अनेकदा मूर्ख समजून त्यांना प्रत्यक्षात न उतरणारी आश्वासने देतात व त्यांची फसवणूक करतात.
जनता जर भावनिक प्रश्नांना जास्त महत्त्व देत असेल तर शेतकरी,शेतमजूर व जनतेच्या मुख्य प्रश्न बाजूला राहतील.आणि धार्मिक,भावनिक मुद्द्यांना राजकीय पक्ष नेहमी आपले राजकीय हत्यार बनवून जनतेचा वापर काहा करतात असा प्रश्न शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.
त्यामुळे जनता पुन्हा पुन्हा अशीच मूर्ख बनवल्या जाईल आणि आपल्या हिताचे,कल्याणाचे प्रश्न नेहमी करीता दुर्लक्षित राहतील.तेव्हा आता तरी जनतेने राजकीय पक्षाच्या खोट्या आश्वासनांना बळी न पडता सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना शेतकऱ्यांच्या शेतमजूर व जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या असा खरपूस प्रश्न प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.