वरोरा शहरात भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना, तक्रार दाखल

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14 नोव्हेंबर) :- वरोरा शहरातील उडानपुलाच्या बाजूला असलेल्या स्मशान भूमीतील भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना काल दिनांक नोव्हेंबर ला उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.

या घटनेचा तीव्र निषेध करून त्या समाजकंटकांना येत्या 24 तासात अटक करा अशी मागणी सकल हिंदू समाज संघटना, श्रीराम जन्मोत्सव समिती, श्री शिवप्रतिष्ठान वरोरा, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल व शिवशाही युवा मंच इत्यादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एक सामूहिक बैठक घेऊन व पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन केली आहे.

वरोरा शहर हे शांत शहर म्हणून ओळखलं जातं, पण काही धर्मांध व असामाजिक तत्वांची माणसे काहीतरी उचापती करून धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून सामाजिक आरोग्य बिघडविण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना वेळीच ठेचून काढायला हवे तरच कुण्याही धर्माच्या विरोधात बोलण्याचा व देवीदेवतांच्या विटंबना करावयाची हिंमत होणार नाही, अशातच वरील घटनेच्या निषेधार्थ सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन 24 तासात आरोपींना अटक करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या तक्रारीतून दिला आहे यावेळी शेकडो हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share News

More From Author

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीम द्या….प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे

हेल्प फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे भाविक भाऊ भगत यांचा वाढदिवस साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *