समाजरत्न पुरस्कार 2023 ने डॉ. अंकुश आगलावे यांचा गौरव

Share News

🔸मा. राज्यपाल याचे हस्ते पुरस्कार प्रदान

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.7 नोव्हेंबर) :- भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय व्दारे नेहरू युवा केंद्र, मंुबई तर्फे डॉ. आगलावे यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजरत्न पुरस्कार 2023 ने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.रमेश बैस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. 

           यावेळी प्रकाश मनोहर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र गोवा, नेहरू युवा केंद्र तसेच जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला उपस्थित होते. या पुरस्कार समारंभात देशातील कोना कोप-यातील अनेक सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.

         डॉ. आगलावे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाज हिताचे कार्य केले आहे. मेरी माटी मेरा देश या उपक्रमात अतुलनिय कार्य केले आहे. यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यात भारत भुषण, राष्ट्रीय पुरस्कार, सेवारत्न पुरस्कार, कोरोना योध्दा पुरस्कार, डॉक्टरेट पदवी इत्यादीने गौरविण्यात आले आहे.

शिर्डी संस्थान व संत गजानन महाराज संस्थानाने डॉ. आगलावे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांचा सपत्नीक सत्कार केला. डॉ. आगलावे हे गुरूदेव प्रचारक असून ग्रामगीता प्रचार व प्रसार करून अंधश्रध्दाचे निर्मुलन करण्याचे कार्य करीत आहे. 

         गुरूदेव सेवा मंडळ व केंद्रीय मानवाधिकार संगठनच्या वतीने अनेक सामाजिक लोकउपयोगी उपक्रम राबवून गरीब, गरजु, वंचित, शोषित, निराधार महिला, प्रकल्पग्रस्त शेतक-यांना मदतीचा हात देत आहे. समाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे कार्य करीत आहे. कोरोना काळात वंचित, गरजुंना अन्न धान्याचे किट्स तथा 24 तास रूग्णवाहिका उपलब्ध करून मदत केली आहे.

          डॉ. आगलावे यांनी अनेक सामाजिक व राजकीय पदे भुषविले आहे त्यात भाजपा जिल्हा ओबीसी महामंत्री असून ओबीसी बांधवाच्या अनेक समस्या शासनदरबारी नेवून अन्याय विरूध्द आवाज उठविला आहे. श्री. गुरूदेव व्यायाम शाळा, पंतजली किसान सेवा समिती, श्री. गुरूदेव प्रचारक, केंद्रीय मानवधिकार संगठन, जिल्हा संघटक अॅलेन थिलक शितोन्यु स्कुल इंटरनॅशनल ब्लॅक बेल्ट डॉन असे अनेक पदे भुषवून त्याव्दारे समाजकार्य करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.

Share News

More From Author

अर्जुनी (तुकुम) ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाचा फडकला भगवा

विठ्ठलजी हनवते चंदनखेडा यांच्या जन्मदिनानिमित्त ६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *