मौजा चंदनखेडा येथे दिवंगत खासदार महोदयांच्या स्मुर्ती पित्यर्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.4 नोव्हेंबर) :- भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे दिवंगत खासदार मा. बाळूभाऊ स्मुर्ती पित्यर्थ छत्रपती क्रीडा मंडळ द्वारा आयोजित सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधिरभाऊ मुडेवार यांच्या मुख्य संकल्पनेतून आणि ग्राम पंचायत चंदनखेडा यांच्या सहकार्यातून दिनांक ०५ नोव्हेबर २०२३ ते ०८ नोव्हेबर २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

चंद्रपूर – वाणी, आर्णी क्षेत्राचे लोकप्रिय दिवंगत खासदार स्व. बाळुभाऊ धानोरकर स्मुर्ती पित्यर्थ चंदनखेडा येथे दिनांक ०५ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ०६. ०० वाजता ग्राम स्वच्छता त्यानंतर सकाळी ठीक ०८.०० वाजता प्रस्तावित नवीन क्रीडा संकुलन येथे फळबाग वृक्षा रोपण घेण्यात येणार त्यानंतर सकाळी ठीक १०.०० मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन या उद्घाटनीय कार्यक्रमाला उद्घाटक म्हाणून मा. श्री. अनिल भाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती, सहउद्घाटक मा. श्री सुधीरभाऊ मुडेवार सामाजिक कार्यकर्ता चंदनखेडा, अध्यक्ष नयनभाऊ जांभुळे सरपंच ग्रामपंचायत चंदनखेडा, प्रमुख अतिथी मा. श्री. अनिलभाऊ चौधरी संचालक कृ.उ.बा.स. भद्रावती, मा. श्री. सुमितभाऊ मुडेवार उपसभापती आ.वि.से.सह.संस्था चंदनखेडा, मा. डॉ. शाहीन सय्यद वैद्यकीय अधिकारी चंदनखेडा, मा. श्री. डॉ. देवाशिष ससाणे वैद्यकीय अधिकारी चंदनखेडा हे आहेत उद्घाटनीय कार्यक्रमा नंतर भव्य महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ०७.०० वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या क्रीडांगनावर पुरुष व महिलांचे कबड्डी सामण्याचे उद्घाटन व रक्तदात्यांचे सत्कार मा. प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा भाद्र्वती विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते करण्यात येणार या कर्यक्रमाला उद्घाटक मा. श्री. सुधीरभाऊ मुडेवार साजीक कार्यकर्ता चंदनखेडा, अध्यक्ष मा. श्री. प्रशांतभाऊ काळे तालुका अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष संजयगांधी निराधार योजना भद्रावती, प्रमुख अतिथी मा. श्री. नयनभाऊ जांभुळे सरपंच ग्रामपंचायत चंदनखेडा रात्रो ठीक ०९.०० वाजता सामाजिक सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादरकर्ते लोकरंग नाट्य कला संगीतमय प्रबोधन मंच भद्रावती.  

           तसेच दिनांक ०६ नोव्हेबर रोजी सकाळी ठीक ०७.०० वाजता प्लास्टिक संकलन त्यानंतर सकाळी ठीक ०९.०० वाजता खुली रांगोळी स्पर्धा, सकाळी ठीक ०९.३० वाजता पाक कला स्पर्धा त्या नंतर सकाळी ठीक १०.०० वाजता जिल्हा परिषद शाळा परिसरात भव्य रोगनिदान माहाशिबीर आयोजन करण्यात आले शिबिरात निशुल्क रोगनिदान व उपचार करण्यात येणार त्यात मेडिसिन तज्ञ , नेत्र्रोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, श्वसन रोग तज्ञ, ह्व्र्दय रोग तज्ञ, मानसिक रोग तज्ञ, दंत व मुखरोग तज्ञ, युरो तज्ञ तपासणी करीता येणार या शिबिराचे वैशिष्ठे शिबीर स्थळावर नोंदणी मोफत, तज्ञ डॉक्टरकडून तपासणी मोफत, भरती रुग्णांना सर्व सामान्य चाचण्या एक्स-रे, रक्त,लघवी,चाचणी सोनोग्राफी तसेच अतिविशिष्ठ चाचण्या सि.टी.स्क्यान, एम.आर.आय. इत्यादी चाचण्या आवश्य्कातेनुसार व डॉक्टर च्या सल्यानुसार, भरती रुग्णांना खाट शुल्क, जेवण मोफत, हृदय रोग तपासणी हि तज्ञ डॉक्टरकडून इसीजी मशीनद्वारे केल्या जाईल. असे आहे या रोगनिदान शिबिराचे उद्घाटन मा. प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र व अध्यक्ष मा. श्री. अभ्युदय मेघे सर, विशेष कार्यकारी अधिकारी दत्ता मेघे उच्चशिक्षित व संशोधन संस्था सावंगी मेघे वर्धा यांच्या उपश्थित होणार आहे.

सकाळी ठीक ११.०० वाजता हळदी कुंकू कार्यक्रम व मार्गदर्शन कार्क्रम आयोजित करण्यात आले असुन या कार्यक्रमा करीता शैक्षणिक मार्गदर्शन मा. सौ. वर्षाताई धानोरकर प्राचार्य फेयरीलन्ड स्कूल भद्रावती, महिला आरोग्य मार्गदर्शन डॉ. मालाताई प्रेमचंद स्त्रीरोग तज्ञ, मा. सौ . सोनम खोब्रागडे अध्यक्षा लोकमत सखी मंच चंद्रपूर, महिला साक्षीकरण मार्गदर्शन मा. सौ. सुनिताई खंडाळकर सामाजीक कार्यकर्त्या भद्रावती व प्रमुख उपस्थिती मा. सौ. स्नेहलताई मुडेवार, सौ. भारती उरकांडे, मुक्ताताई सोनुले, सौ. प्रतिभाताई दोहतरे, सौ. मनीषा ठावरी, सौ. रंजना हनवते, सौ. सविता गायकवाड हे राहतील. दुपारी ०२.०० वाजता महिलान करीता संगीत खुर्ची स्पर्धा व महिलां करीता अल्पोहाची व्यवस्था सौ. स्नेहलताई मुदेवार यांचे कडून दुपारी ०३.०० वाजता महिला कबड्डी सामने व साय. ०६.०० वाजता पुरुष कबड्डी सामने 

             दिनांक ०७ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ०८.०० वाजता मरेथान स्पर्धा व सकाळी ०९.०० वाजता पुरुष व महिलांचे कबड्डी सामने आणि दिनांक ०८ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजता समारोपीय कार्यक्रम या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. प्रशांतभाऊ काळे तालुका अध्यक्ष तथा माजी अध्यक्ष संजयगांधी निराधार योजना भद्रावती, सहउद्घाटक श्री. नयनभाऊ जांभुळे सरपंच ग्रामपंचायत चंदनखेडा, अध्यक्ष मा. श्री. सुधीरभाऊ मुडेवार साजीक कार्यकर्ता चंदनखेडा विशेष अतिथी मा. श्री चंद्रकांतजी दानव, श्री. अनिलभाऊ चौधरी, श्री सुमित मुडेवार उपसभापती आ. वि. से. सह.संस्था चंदनखेडा, श्री भानुदास गायकवाड, श्री. ईश्वरजी धांडे, श्री. जगदीश बोढे, श्री. गुलाब भरडे, सौ . भारतीताई उरकांडे उपसरपंच ग्रा. प. चंदनखेडा हे आहे. या सगळ्या कार्यक्रमा करीता विशेष सहकार्य ग्रामपंचायत चंदनखेडा, पंचशील बौध्द मंडळ, महात्मा फुले समाज सुधारक मंडळ, संत गोरोबा काका समाज मंडळ, आदिवाशी माना जमात समाज संगठन, गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी याचे आहे .

Share News

More From Author

घुग्गुस येथील भूस्खलनाचा धोका असलेल्या १६० कुटुंबाचे होणार पुनर्वसन

अर्जुनी सालोरी ग्रामपंचायत ची पोट निवडणूक शांततेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *