✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.31 ऑक्टोबर) :- चिमूर -वरोरा तालुक्यातील अनेक गावांना अनेक समस्यांनी उभारल्या असून शासकीय कोणतीही मदत वेळेवर मिळत नाही.विद्युतचा व रस्त्यांचा गंभीर प्रश्न असून या प्रश्नाकडे कोन्याही राजकीय लोकप्रतिनिधीला लक्ष द्यायला वेळ नसल्याने या तालुक्यात कुणी मायबाप आहे की नाही?प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.
चिमूर -वरोरा तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे नदी व नाल्या काठच्या तसेच शेतात विहीर असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत पिके लावली परंतु नदी,नाले व विहिरीत भरपूर पाणी असतांनाही विद्युतच्या होल्टेज अभावी शेतातील पिके करपून चालली या भागात गेल्या अनेक दिवसापासून विद्युतचा सततचा होल्टेज कमी जास्त मुळे कृषी पंप जळू चांगली आहे.त्यामुळे शेतकरी राज्यावर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.तर अनेक ठिकाणच्या इलेक्ट्रीक डि पी जळालेल्या आहे.अनेक ठिकाणी विद्युत आली तरी होल्टेज राहत नाही.
तर काही दिवस लाहीन दर पाच-पाच मिनिटांनी लपण डाव खेळत असतात. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेली पिके विद्युत अभावी ,पाणी देता येत नसल्याने ती करपून चाललेली आहे. शेतकऱ्यांनी आपले जीवन कसे जगावे?असा गंभीर प्रश्न चिमूर-वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. तसेच या दोन्ही तालुक्यात रस्त्यांची अतिशय गंभीर आणि बिकट परिस्थिती झालेली आहे.
या भागात आरोग्याच्या सोयी अपूर्ण असून आरोग्य केंद्रामध्ये औषधीचा तुटवडा आहे.औषधी वेळेवर रुग्णांना मिळत नाही. घरकुलाचे हप्ते सहा सहा महिन्यापासून थकलेले आहे.
निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना तीन चार महिन्यापासून अनुदान मिळाले नाही मंजूर असलेल्या घरकुलांचे हफ्ते सहा सहा महिन्यापासून मिळत नाही.यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही.जनतेच्या प्रश्नाकडे सत्ताधारी पक्षाच्या लक्ष देत नाही.असल्याने चिमूर-वरोरा तालुक्यात कोणी वाली आहे.की नाही अशा कडक शब्दात प्रहार केला आहे.
चिमूर -वरोरा तालुक्यात समस्या,अडचणी सोडविण्यासाठी कोणताही सत्ताधारी लोकप्रतिनिधी पुढाकार घेतांना दिसत नसल्याने या तालुक्यात कोणी राजकीय मायबाप आहे की नाही?अशी संतप्त प्रतिक्रिया प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.