🔸शुभम आमने आणि निकिता माणुसमारे माती कलश घेऊन मुंबई व दिल्लीतील कार्यक्रमासाठी रवाना
✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.26 ऑक्टोबर) :- केंद्र सरकारच्या वतीने देशभरात भारत मातेच्या विरांच्या सन्मानार्थ राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमात वरोरा तालुक्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या वतीने शुभम शिवशंकर आमने व निकिता माणुसमारे यांची अमृत कलश घेऊन जाण्यासाठी निवड झाली असून ते आपले कार्यकर्तेअसल्याचा अभिमान असल्याचे किशोर टोंगे यांनी प्रतिपादन केले. आज ते दोघेही मुंबई येथील कार्यक्रमाकरिता रवाना झाले असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथील कार्यक्रम पार पाडून दिल्ली करिता रवाना होत आहेत.
आज पंचायत समिती वरोराच्या वतीने या स्वयंसेवकांना मातीचा कलश सोपविण्यात आला. हा आमच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. समाजकारणात काम करत असताना आमच्या कार्यक्रत्यांना अशी संधी मिळणे हा त्यांच्या सामाजिक कामाचा गौरव आहे असे मी मानतो असेही ते म्हणाले.
आपल्या गावागावातील मातीचा कलश गट विकास अधिकारी श्री. संदीप गोडशेलवार आणि त्यांचे सहकारी नरेंद्र पेटकर, प्रणव बसे व अन्य अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत शुभम कडे सोपविला ही अभिमानाची बाब असून शुभम आणि निकिता दिल्ली येथील पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे.
यावेळी त्यांच्या वतीने शुभम आमने आणि निकिता माणुसमारे या दोघांचाही सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभम आमने आणि निकिता यांनी आपल्याला ही संधी मिळाली त्याबद्दल प्रशासन आणि किशोर टोंगे यांचे आभार मानले.