गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Share News

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बु (दि.22 ऑक्टोबर) :- मधील युवक शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि. २२ ऑक्टोबर ला उघडकीस आली. 

 सविस्तर वृत्त या प्रमाणे कि शेगाव बु मधील कोटकर ले आउट मधे राहणारा नितीन उर्फ (गोलू ) रामकृष्ण बावणे वय 21 वर्षे हा युवकाणे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ५ च्या सुमारास उघडकीस आली.

सदर युवक हा घटनेच्या वेळेला घरी एकटाच होता. आई वडील दोघेही शेतात कामाला गेले होते. सायंकाळी तरुणांची आई घरी आली असता सदर युवक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्याची तुंबड गर्दी झाली होती.

 सदर युवक गोलू हा आई वडिलांना एकमेव मुलगा होता शिवाय वृद्ध काळात त्यांचा तो मुख्य आधार असल्याने सर्वत्र दुःख व हळहळ व्यक्त केले जात आहे. त्याच्या असा एकाकी निर्णयाने आई वडिल यांना असलेला एकुलता एक आधार स्तंभ गेल्याने आई वडिलच आता पोरके झाले आहे.

      गावकऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कडे शेती असून शेतीच्या भरोष्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते शिवाय डोक्यावर बँक खाजगी सावकाराचे कर्ज होते . शिवाय यावर्षी नापीक झाल्याने लोकांचे कर्ज कसे फेडायचे या मुख्य कारणावरून तरुण युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे .

सदर या घटनेचा तपास पोलीस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शन येथील पोलीस कर्मचारी करीत आहे . मृतक गोलू यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आला. या घटनेमुळे गावात गाव परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

Share News

More From Author

जिल्हा परिषदच्या शाळेच्या बालकांनी साधला पोलिस निरीक्षकासी संवाद

माजरी येथील  शिवशक्ती  दांडिया उत्सवाला उदंड प्रतिसाद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *