पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाईजी 13 ला भद्रावती मध्ये 

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.11 ऑक्टोबर) :- धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा समिती भद्रावती च्या वतीने दोन दिवसीय ‘भव्य बौद्ध धम्म सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. परम पूज्य डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर १९५६ ला आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धाम्माची दीक्षा दिली तेव्हा पासून हा दिवस ‘ धम्म चक्र प्रवर्तन दिन’ म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येते त्याच अनुषंगाने सामितिच्या वतीने भद्रावती येथे दोन दिवसीय ‘भव्य बौद्ध धम्म सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे .

करिता 13 ऑक्टोम्बर ला बौद्ध धम्माचे धर्म गुरु पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाईजी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भव्य धम्म रॅली होत असून पूज्य भदन्त नागार्जुन शुरेई ससाईजी यांचे भद्रावती टप्पा परिसरामध्ये दुपारी ठीक 2:00(दोन) वाजता आगमन होणार आहे तिथे भव्य स्वागत कार्यक्रम करण्यात येईल , त्या नंतर एतिहासिक बौद्ध लेणी भद्रावती येथे वंदन करण्याकरिता पूज्य भन्तेजी प्रस्थान करतील.

व ठीक दुपारी 3:00(तीन) वाजेपासून पूज्य भन्तेजिच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बौद्ध धम्म रॅली कार्यक्रम स्थळी प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत राहील व कार्यक्रम स्थळी ‘धम्म दीक्षा समारंभ व विविध कार्यक्रम राबविले जातील.

तसेच दुस-या दिवशी नेहमी प्रमाणे ‘भव्य धम्म शोभा यात्रा’ व आतिषबाजी सायंकाळी ठीक 5:00 (पाच) वाजेपासून राहील या धम्म सोहळ्याची समितीच्या वतीने जय्यत तयारी चालू असून भद्रावती बौद्ध बांधवांनी हजारोच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे जाहिर आव्हान धम्म चक्र प्रवर्तन दिन सोहळा समिती भद्रावती तर्फे करण्यात येत आहे.