सिंदेवाही तालुक्यातील चिटकी(chitki)जंगलात विद्युतप्रवाहाने हत्तीचा मृत्यू (Death of an elephant by electrocution)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3 ऑक्टोबर) :- ओडीसा राज्यातून छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रात दाखल झालेल्या नर हत्तीचा मृत्यु सिंदेवाही तालुक्यातील चिटकी परिसरात झाला. 

सविस्तर वृत्त असे की ओडीसा राज्यातून आलेला नर हत्ती गडचीरोली च्या जंगल मार्ग वैनगंगा नदी ओलांडून चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रह्मपुरी नंतर सावली नागभीड तालुक्यातील जंगलातून मागिल पंधरा एक महीन्यापासून सिंदेवाही तालुक्यातील जंगल परिसरात होता . मागील पंधरा दिवसांपुर्वी सिंदेवाही तालुक्यातून ब्रह्मपुरी तालुक्यातील जंगल परीसरात गेला होता. 

अचानक दोन दिवसापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील जंगलात दाखल झाला नर हत्तीचा चा मृत्यू सिंदेवाही उपक्षेत्रतील लौनखैरी कक्षक २४७ आर. एफ च्या सिमेवर विज प्रवाह सोडून जंगलात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती मिळताच वनविभागाने आपले सुत्रे हालवले व चौकशी केली असता अशोक पांडुरंग बोरक र रा चिटकी व अजय अशोक बोरकर यांनी विज प्रवाह सोडून हत्तीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे दोघा विरुद्ध पी.ओ. आर. क 09130/228231अन्वये वनगुन्हा नोंदवून अटक केली. 

घटनेची माहिती मिळताच डॉ जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक, दिपेश मल्होत्रा उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी वनविभाग, एम बी चोपडे सहायक वनसंरक्षक,वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, डॉ रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी, बंडू धोत्रे, विवेक करंबेकर, डॉ सुरपाम व डॉ शालिनी ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. 

या अगोदर सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार या गावात मागील दोन ते तीन दिवसांपासून हत्तीने शेतशिवारात थैमान घातले होते . यात कच्चेपार येथील जंगलालगतच्या शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हत्तीच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. 

 रात्रीच्या सुमारास जंगललगत असलेल्या 20 शेतकऱ्यांच्या शेतीतील धान पिकांचे नुकसान केले होते . त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. या हत्तीने कच्चेपार येथील देविदास आत्राम यांच्या शेतातील एक विद्युत खांब सुद्धा पाडला होता .

शेतातून हत्ती पिके तुडवित असल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले होते . त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते एकप्रकारे समृद्ध जंगलात वास्तव्य शोधण्यार्या हत्तीचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमी निराश झाले असल्याचे दिसून येत आहे.

सदर हत्ती खुप मोठा असल्याने त्यांच्या वर अंत्यसंस्कार कसे करावे असा प्रश्न वनविभागाला पडला. त्यानंतर वनविभागाने हत्तीचा अग्नी देउन अंत्यसंस्कार केल्याची माहिती आहे .

     एवढ्या मोठा हत्ती या परीसरात आढळून आल्याने व त्यांच्या मृत्यू झाल्याने बघ्याची गर्दी खूप वाढली होती त्यामुळे सिंदेवाही पोलीस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त केला होता.