✒️सुनील भोसले जालना(jalna प्रतिनिधी)
जालना (दि.15 सप्टेंबर) :- येथील पोलिसांवर अन्याय का?पोलिसांचे निलंबन म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असे म्हणावे लागेल. दिनांक 01/09/2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनात सामान्य जनता आणि सामान्य जनतेचे रक्षक असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या दगडफेकीच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले होते. मराठा बांधवांच्या वर पोलिस अचानक हल्ला करणार नाहीत आणि पोलिसांच्या वर मराठा समाज हात उचलणार नाही.
मग यामागचा खरा सूत्रधार कोण? सदर हल्ला कोणी केला? का केला? यामागचा हेतू काय होता हे तपासणे गरजेचे होते.मराठा समाज बांधव व पोलिस प्रशासनाच्या मध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना शिक्षा द्यायची सोडून.पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचे चुकीचे आहे. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीवर चढवण्या सारखे झाले आहे.
सदर ठिकाणी झालेल्या पोलीस बांधवांच्या हितार्थ व दगडफेकीच्या निषेधार्थ पोलिसांना झालेल्या जखमेबाबत पोलिसांना आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाने करून पोलिसांना जखमेतून दुरुस्त होई पर्यंत पगारिरजा देण्यात येवून.निर्दोष असलेल्या पोलिसांवर महाराष्ट्र शासनाने केलेली निलंबनाची कार्यवाही तत्काळ मागे घेवून.त्यांना सन्मानाने कर्तव्यावर रुजू करावे.अशी मागणी जालना जिल्हाधिकारी साहेबांचे कडे करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी दखल घेऊन दिनांक 30/09/2023 पर्यंत निर्णय घेण्यात यावा.असे न झाल्यास दिनांक 01/10/2023 रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा समाजसेवक गजानन दराडे,तसेच समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी निवेदनातून दिला आहे.