आमदार प्रतिभा धानोरकर यांचा विधवा महिलेला मदतीचा हात

Share News

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.13 सप्टेंबर) :- वरोरा भद्रावती विधानसभेच्या लोकप्रिय आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सालोरी येन्सा ब्लॉक मजरा (लहान )येथील विधवेला सानुग्रह मदत करुन आपल्या उदार अंतकरणाचा परत एकदा परिचय दिला आहे. या अगोदर सुद्धा विधानसभा क्षेत्रातील कोविड काळात मृत्युमुखी पडलेल्या अनेक कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार दिला आहे तर अनेक अपंगांना,निराधार यांना व शालेय विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत केलेली आहे.

सालोरी येन्सा ब्लॉक येथील वैशाली गुंडाळी ( ३५) या गरीब विधवेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले.पतीच्या निधनानंतर ती आपल्या सर्वेश व अभिजीत या दोन अपत्यासह मजरा (लहान) येथे वास्तव्यास आहे.तिला एका गंभीर आजाराने ग्रासल्याने नुकतीच शस्त्रक्रिया करावी लागली.

शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ती दवाखान्यातुन आपल्या घरी आली परंतु घरी अठरा विश्व दारिद्र असल्याने पुढील उपचार तथा घरची परिस्थिती हातावर आणून पानावर खाण्याची असल्याने कुटुंब चालवण्यासाठी तिला तारे वरची कसरत करावी लागत होती. शस्त्रक्रियेमुळे ती कामावर जाऊ शकत नव्हती. तीने गावातील अनेक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मदत करण्याची विनंती केली परंतु आश्वासनाशिवाय तिच्या पदरी काहीच पडले नाही . ती कामाला जाऊ शकत नसल्याने कुटुंबातील मुलांचे पालन पोषण तथा इतर खर्च करण्यास ती असमर्थ होती.

त्यामुळे तिला अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने याबाबतीत तीने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार ग्यानीवंत गेडाम व सतत मागील सात वर्षापासून गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या सदा कोणाच्याही हाकेला धावून जाणाऱ्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सारिका धाबेकर यांच्याकडे मदत मिळवून देण्याकरिता विनंती केली. लगेच वरोरा पंचायत समिती च्या माजी उपसभापती संजीवनी मिलिंद भोयर यांच्याकडे ग्यानीवंत गेडाम व सारीका धाबेकर यांनी कैफियत मांडली व मदत मिळवून देण्याची मागणी केली.

संजीवनी भोयर यांनी लगेच ही गंभीर बाब वरोरा भद्रावती विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना सांगितली. त्या अनुषंगाने सामाजिक दायित्व जोपासत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सदर विधवेला आर्थिक व सानुग्रह मदत देऊन कार्यकर्ते ग्यानीवंत गेडाम व सारीका धाबेकर यांना लगेच मदत सुपुर्द करण्यास सांगितले‌. व मदत देऊन त्यांनी आपले सामाजिक दायित्व निभावले.

वैशाली गुंडाळी यांना अनुग्रह मदत देतेवेळी ग्यानीवंत गेडाम, सारिका धाबेकर , उपसरपंच प्रमोद तोडासे, ग्रामपंचायत सदस्यां प्रतिभा मानकर, सामाजिक कार्यकर्ते धनराज वांढरे, कैलास तोडासे, गवशा गोबाळे, दीपा झाडे, तान्हेबाई आपटे हे उपस्थित होते.

सदर विधवेला सानुग्रह मदत मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता तिने आमदार प्रतिभा धानोरकर व माजी पंचायत समिती उपसभापती वरोरा संजीवनी मिलिंद भोयर यांचे आभार मानले आहे.

Share News

More From Author

चिमुकल्याची चिमुकली बँक, देते वित्त व्यवहाराचे धडे दादापुर येथील जि. प. शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या : किशोर टोंगे यांची मागणी  Give reservation to Maratha community without affecting reservation of OBC: Kishore Tonge’s demand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *