ई-पीक पाहणी करण्याचे तहसीलदार योगेश कौटकर यांचे आव्हान

Share News

▫️शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केल्यास शासकीय योजनांचा मिळेल लाभ

▫️१५आँक्टोबर पर्यत आहे मुदत

✒️मनोहर खिरटकर (खांबाडा प्रतिनिधी)

खांबाडा (दि.6 सप्टेंबर) :- वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकांची नोंद गरजेची असल्याने आता ई पीक पाहणी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतः त्यांच्या सातबारावर पिकांची नोंद करायची आहे. पिक विमा अर्ज करताना, तसेच शासनाच्या नुकसान भरपाई चा लाभ मिळवताना व इतर सर्व योजना करिता ई पीक पाहणी करणे आवश्यक असून इतरत्र न जाता स्वतःच्या किंवा गावातील सुशिक्षित तरुण, कोतवाल व इतरांच्या मदतीने मोबाईलवर ई पीक पाहणी अॅपच्या सहाय्याने करून घेण्याचे आव्हान वरोरा तहसीलचे तहसीलदार योगेश कौटकर खाबांडा येथील शेतकर्याच्या प्रत्यक्ष बांधावर जावून केली पिक पाहणी केली आहे. 

ई-पीक पाहणी नोंदणी वेळेत पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजना पीकविमा शासकीय अनुदानासह विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे ई- पंचनामे यापद्धतीने होणार असून त्यासाठी ई- पीक पाहणी नोंदणी करणे हे सर्वांना गरजेचे आहे. खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घ्यावे, महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून १५आँक्टोबर पर्यत राज्यभर राबविण्यात येत आहे. ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये वरोरा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून आपल्या पिकांची नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत सुरू असलेल्या खरीप हंगामाची पीक पाहणी देखील १०० टक्के पूर्ण करणे आवश्यक आहे.

वरोरा तालुक्यातील सर्व शेतकरी, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचतगट प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव, ग्रामरोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विद्यार्थी प्रगतिशील शेतकरी, सर्व ग्रामपंचायत, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेचे सदस्य, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे तहसीलदार योगेश कौटकर यांनी केले आहे.

पीक पाहणी अॅपचा वापर केल्यास शेतकऱ्यांनी घेतलेले पीक व येणारे उत्पन्न याचा आकडा सरकारला सहज उपलब्ध होणार आहे. अनेक पिकांना हमीभाव मिळण्यास शेतकऱ्यांना याची मदत होणार आहे असे आवाहन केले 

यावेडी खाबांडा साझाचे तलाठि राखी टिपले,नायब तहसिलदार उल्हास लोखंडे, खाबांडा येथील शेतकरी अशोक ताजने,मनोहर खिरटकर, संतोष साटोने, संतोष न्याहारे,हर्षल देवतले, खाबांडा येथील कोतवाल तांबेकर,, शेतकरी दुषांत ताजने पदमाकर कडुकर,मुरदगाव येथील शेतकरी गाडगे,आजनगाव येथील शेतकरी विवेक लढि सह शेतशिवारातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Share News

More From Author

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे  चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा भव्य सत्कार self Srinivasa Shinde Memorial Ravindra Shinde Charitable Trust felicitates retired teachers

यवतमाळ जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेऊन धर्मनेता किसनभाऊ राठोड यांच्या वाढदिवस साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *