चंद्रपुरात इस्त्रायली तंत्रज्ञानाने बहरणार टोमॅटो  Tomatoes will flourish in Chandrapur with Israeli technology

▫️‘आत्मा ‘ देणार जिल्ह्यात लागवडीला प्रोत्साहन(‘Atma’ will give encouragement to cultivation in the district)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि .31 ऑगस्ट) :- धान,कपाशी व सोयाबीन उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात “आत्मा’च्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर इस्रायली तत्रज्ञानाने टोमॅटो लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरिता फळरोपवाटिका ,कृषी चिकित्सालय या ठिकाणी रोपे तयार करण्याचे काम होईल. तसा ठरावही जिल्हास्तरीय शेतकरी सल्ला समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला आत्मा प्रकल्प संचालक प्रती हिरळकर, उपसंचालक एन. एन. घोडमारे यांच्यासह शेतकरी प्रतीनिधीची उपस्थिती होती. चारगाव (ता. वरोरा) येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर भलमे यांनी २०१८ मध्ये कृषी विभागाच्या सहकार्यानि इ इस्राएलचा अभ्यास दौरा केला होता.

यावेळी त्यांनी आपल्या सोबत त्या भागात येणाऱ्या टोमॅटोचे बियाणे आणले होते. त्याची लागवड त्यांनी आपल्या शिवारात केली. या टोमॅटोला लागवडीनंतर तीन महिन्यांत फळे येतात व ती सात ते आठ महिने मिळतात. या झाडाची उंची साधारणतः आठ ते दहा फूट होते.

भलमे यांच्या अभ्यासाअंती ही माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नाविन्यपूर्ण बाब म्हणून इस्रायली टोमॅटो लावण्यात येणार आहेत. त्याकरिता भलमे यांनी रोप तयार करण्यासाठी शासकीय फळरोपवाटिका व कृषी चिकित्सालयांना इस्रायली टोमॅटोचे बियाणे निशुल्क उपलब्ध करून दिले.

त्याआधारे आता रोप तयार करून तालुक्यातील महिला गटांना लागवडीच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हि टोमॅटो उत्पादनासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. भलमे यांनी लागवड केलेल्या टोमॅटोची पाहणी चंद्रपूरचे तत्कालीन एसएओ भाऊसाहेब बऱ्हाडे यांनीही केली होती.