वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार तर दुसरी जखमी One cow was killed and another injured in a tiger attack

Share News

▫️शहरातील केसुर्ली शिवारातील घटना(Incident at Kesurli Shivara in the city)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.18 ऑगस्ट) :- तालुक्यातील चारगाव, कुरोडा परिसरातून आलेल्या वाघाने शहरातील केसुर्ली परिसरात आपला तळ ठोकला असून या वाघाने केसुर्ली परिसरातील एका शेतात एका गाईला ठार मारले असून दुसरीला जखमी केल्याची घटना भद्रावती शहरालगतच्या केसुर्ली शेतशिवारात घडली. यात सदर शेतकऱ्याचे जवळपास 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

केसुर्ली शिवारातील राजू खामकर यांची शेतात त्यांची एक जर्सी गाय व एक संकरित जर्सी गाय चरत होती. दुपारच्या वेळेस वाघाने या गायींवर हल्ला केला. त्यात एका गायीचा मृत्यू झाला तर दुसरी गाय जखमी झाली.

या घटनेचा वनविभागातर्फे पंचनामा करण्यात आला. त्यानंतर या स्थळावर कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर या कॅमेरा मध्ये सदर वाघ कैद झाला आहे. हा वाघ गेल्या आठवड्यापासून शहरालगत फिरत आहे. पालिकेच्या घनकचरा प्रकल्पालगत याच वाघाने आठवड्यापूर्वी दर्शन दिले होते.

मात्र हा वाघ अद्यापही शहरालगत फिरत असल्यामुळे शहरातील केसुरली व विंजासन भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील नागरिकांना बाहेर फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन भद्रावती नगरपालिका प्रशासन व वन विभागाने केले आहे.

Share News

More From Author

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे वनविभाग व विभागीय नियंत्रकांना निवेदन Statement by Shiv Sena (Uddhav Balasaheb thakare) to Forest Department and Divisional Controllers

छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रथमतच माजी विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण For the first time in Chhatrapati Shivaji Vidyalaya, flag hoisting by former student

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *