स्वतंत्रदिनी खेमजई येथे रक्तदान शिबिर Blood Donation Camp at Khemjai on Independence Day

Share News

▫️युवकांचा प्रचंड प्रतिसाद(Huge response from youth)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.17 ऑगस्ट) :- स्वातंत्र्यदिना निमित्त 15 ऑगस्ट 2023 रोजी दत्त मंदिर खेमजई येथे रक्तदान शिबीर सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात आले.

शिबिराचे उदघाटक खेमजई गाव विकास समितीचे सल्लागार डॉ. प्रमोद गंपावार उपस्थित होते. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षन संस्थेचे कार्यक्रम समन्वयक रमेश बादाडे, डॉ. सतीश अघडते, किशोर डुकरे, उपसरपंच चंद्रहास मोरे, पोलीस पाटील विश्वनाथ तुराणकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकर धोत्रे, प्रमोद गायकवाड इत्यादी उपस्थित होते. या शिबिरात खेमजई, भटाला, सालोरी, केम, आसाळा, वायगाव इत्यादी गावातून 56 रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्वातंत्र्यलढ्याशी व मानवतावादाशी घट्ट नाते जोडले.

डोळ्याच्या आजाराची साथ असल्यामुळे अनेकांना रक्तदान करता आले नाही.अमन रक्त पेटी द्वारा 100 सीताफळ झाडे खरेदी करीता 3 हजार रुपये मदत देण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी रमेश चौधरी, देवेंद्र दडमल, योगेश कोहळे, किशोर डुकरे, विनायक बावणे, रविंद्र रणदिवे, प्रवीण तुमसरे यांनी सहकार्य केले.

Share News

More From Author

15 ऑगस्ट शुभ मुहूर्तावर वडकी हडपसर अंकीत येथे स्नेहल महीला शिक्षण संस्थाचे उद्घाटन Inauguration of Snehal Mahila Education Institute at Vadki Hadapsar Ankit on 15th August auspicious time

स्वातंत्र्य दिनी भद्रावतीच्या दोन युवकांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून करुन अंत  On Independence Day, two youths of Bhadravati drowned in the river bed of Wardha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *