✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.16 ऑगस्ट) :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिती द्वारा स्थापित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन पिजदुरा येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा सातवे सत्रातील विद्यार्थी , ग्रामपंचायत पिजदुरा व जिल्हा परिषद शाळा यांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली व प्रभात फेरी द्वारे कृषी दुतांनी गावांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाबद्दल जनजागृती केली. त्यानंतर गावचे सरपंच सौ. सुनिता आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्याने देशभक्तीवर गीत व भाषण दिले.
गावचे वातावरण पूर्ण देशमय करण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यक्रमाची शोभा कृषी दुतांनी वाढवली. ज्यामध्ये कृषी दुतांनी कृषी क्षेत्रामधील संशोधनाचा आढावा शेतकऱ्यांना दिला. कार्यक्रमांमध्ये गावचे सरपंच सुनीता आत्राम, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. पोतदार सर, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन सर, कार्यक्रम समन्वक डॉ. एस. एन. पंचभाई सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये सातव्या सत्राचे विद्यार्थी हर्षल लोथे, शुभम गुंजाळ, ज्ञानेश्वर तायडे, हिमांशू सोनटक्के, भवानी प्रसाद व स्वरांशु मून इत्यादी सहभागी होते