✒️प्रतिनिधी वाघेडा(मनोज कसारे)
नागपूर(दि.18डिसेंबर):-विधान भवनावर सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी भव्य मोर्चाचे आयोजना बाबत शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी हॉटेल शिवालय गजानन महाराज वाटिकेजवळ खामगाव रोड शेगाव येथे राज्यव्यापी बैठकीचे आयोजन राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने करण्यात आले या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय तथा राज्यस्तरीय नेते उपस्थित होते राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे सस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन ऐकून एकवीस मागण्याचे निवेदन महाराष्ट्र शासनास सादर करण्याचा निर्णय सर्व संघटनांच्या अनुमतीने घेण्यात आला.
या वेळी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या प्रदेश अध्यक्ष पदी ॲड.अमोल बावणे यांची तर भद्रावती चे शिवसेना नगर सेवक नंदू पडाल यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी आणि खामगाव येथील सेवा निवृत्त अधिकारी प्रल्हाद शिरजोशे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्या बाबत त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व हार देऊन सन्मान करण्यात आला.
या सभेला मार्गदर्शन करतांना अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखडे यांनी मराठवाड्यातून जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव नागपूरला येतील असा विश्वास व्यक्त केला तर भारतीय मछूवारा संघटनेचे अध्यक्ष अडव्होकेट शंकरराव वानखेडे महासचिव अडव्होकेट दादाराव अळने यांनी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले विदर्भ भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष उंकडराव सोनवणे, राजाराम मात्रे यांनी प्रथमच संपूर्ण समाज संघटना एकत्रित आल्यामुळे भव्य मोर्चा नागपूरला धडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
भोई समाज बहुउद्देशीय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे उमेश नंदाने , क्रांती दलाचे कार्याध्यक्ष नंदू पडाल , विदर्भ मच्छिमार सहकारी संघाचे अर्जुन नेमाडे यांनी आपले मत व्यक्त करून बुलढाणा जिल्ह्यातून सर्वात जास्त मच्छिमार नागपूरला आणणार असल्याचे सांगितले क्रांती दलाचे प्रदेश अध्यक्ष अमोल बावणे म्हणाले की संघटनेने मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण पणे जबाबदारी ने पार पाडनार असल्याचे सांगितले..