▫️शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान(Millions of losses to farmers)
✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.27 जुलै) :- स्थानिक शेगाव परिसरातील चारगाव मध्यम प्रकल्प धरणाच्या महा पुरामुळे येथील परिसरातील अनेक शेती हजारो एकर शेत जमीन पाण्याखाली असून शेतात असलेल्या पिकाला याचा धोका निर्माण झाला असून जिवंत असलेले रोपटे पाण्याने सडून जात आल्याची भीती नाकारता येत नाही करिता येथील शेतकऱ्यांचे तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्याला फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
सविस्तर असे की बुधवार ला झालेल्या मुसळधार पावसाने चारगाव धरणाला बढती आली असून नदीला महापूर आला असून पुराचे पाणी सैरावैरा धावत अनेक शेतामध्ये घुसले आहे गेले चोवीस तास होऊन देखील पुराचे पाणी कमी होण्याचे नाव घेत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेत पिकाचे मोठे नुकसान होत आहे.
करिता संबधित विभागाने , तहसीलदार साहेब यांनी तात्काळ या भागाची पाहणी करून तात्काळ मोका चौकशी करून पीडित पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी . अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. चारगाव बू , चारगाव खुर्द , अर्जुनी , कोकेवाडा तू. या गावातील अनेक शेतकऱ्याच्या शेत जमीन नदी लगत असल्याने सर्वाधिक नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे .
तसेच कोकेवाडा तू. येथिल प्रतीक खिटरकर यांची सर्वाधिक शेत जमीन नदी लगत असलेल्या पुराच्या पाण्यामुळे धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे युवा शेतकरी प्रतीक खिरटकर यांनी सांगितले तेव्हा या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून पीडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे..