अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून अजुनही शेतकरी वंचितच

Share News

✒️ शेगांव (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगांव (दि.१५ डिसेंबर) :- वरोरा तालुक्यातील नागरिकांच्या मुख्य व्यवसाय हा शेती असून शेगाव परिसरामध्ये कुठलाही मोठा उद्योग धंदा नसल्याने शेतकरी आपला कुटुंबाच्या उदरनिर्वाह शेतीवरच करत असतात.

यावर्षी पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतामध्ये पेरलेले धान,कपास,तुर पिकांची मोठे नुकसान झाली असून शेतकऱ्यांच्या पिकांचे सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई दिली

 परंतु अजून पर्यंत अर्जुनी तुकुम,शिवनी रिठ, भानुसखिंडी, वायगाव येथील परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मिळाले नसल्यामुळे वारंवार शेतकरी बँकेत,तहसील कार्यालय वरोरा,पटवारी ऑफिस इथे जाऊन चकरा मारत परत निराश होऊन येत असून शेतकऱ्यांना संबंधित अधिराकडून उडवा उडवीचे उत्तरे शेतकऱ्यांना दिले जात आहे तरी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे….

Share News

More From Author

चंदनखेडा येथे आधारभुत खरेदीचा शुभारंभ

सावकारी कर्ज व बोगस विक्रीपत्र करून शेतकऱ्यांची फसवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *