माढेळी नागरी मार्गे सुरू असलेली बससेवा पुन्हा सुरू करा .. अभिजित कुडे Resume bus services running through Madheli Nagari ..Abhijit Kude

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर(दि.21 जुलै) :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविन्द्र भाऊ शिंदे व तालुका प्रमुख दत्ता भाऊ बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक वरोरा यांना निवेदन दिले.

गेल्या 2 वर्षापासून माढेली नागरी बससेवा बंद झाली आहे. आधी माढेली वाघनख पाटी ,उखर्डा पाटी ,शेगाव पाटि या मार्गे सुरू असलेली बससेवा पुन्हा सुरू करावी. रस्ता पूर्ण खराब झाल्या या मार्गाने सुरू असलेली बससेवा बंद झाली होती त्यामुळे या मार्गाने प्रवाशांना कोणतेच साधन नाही. शाळा, कॉलेज सुरू झाले आहे.

या मार्गावरील लोकाना वाहतुकीचे दुसरे साधन नाही आता या रस्त्याची डागडुजी झाली आहे व या रस्त्याने बस जावू शकते त्यामुळे बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करावी असे निवेदन आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले. कलियुगात रस्त्याच्या दुर्दशा झाली होती त्यामुळे बससेवा बंद असल्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतो आहे. विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, प्रवाशांना दुसरा पर्याय नाही. वरोरा हे तालुक्याचे ठिकाण आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना वरोरा ला नेहमी कामानिमित्त यावे लागते त्यामुळे गोर गरीब, शेतकर्‍यांना या मार्गाने पर्यायी व्यवस्था नाही तात्काळ या मार्गाने बससेवा सुरू करावी असे निवेदन दिले. यावेळी युवा सैनिक निखिल मांडवकर, वैभव पावळे , कुणाल ईखार, तेजस सैनिक उपस्थित होते..