विमा कंपनी ने केली शेतकऱ्याची थट्टा

Share News

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.१५ डिसेंबर) :- संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सततधार पावसाने अनेक शेतमध्ये पाणी साचले तर अनेक शेतकऱ्याचे पीक देखील वाहून गेली तर शेतकऱ्यांचे ७० ते ८० टक्के प्रमाणात नुकसान झाले… याचा विमा कंपनी कडून काही लाभ मिळेल या करिता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला परंतु विमा कंपनीने येथील शेतकऱ्याची चांगलीच थट्टा केली असल्याचा प्रकार नुकताच उघडकिस आला आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात अल्पशा रक्कम देऊन शेतकऱ्याची फसवणूक केली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे..

शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम अत्यल्प प्रमाणात जमा करण्यात आली कुणाला ती रक्कम इन्शुरन्स क्लेम पेक्षा कमी आली तसेच कुणाला आली पण नाही अतिवृष्टीमुळे झालेली नुस्कान हे खूप मोठ्या प्रमाणात झाले सोयाबीन तसेच पराठी- कपास , चार दिवस पाण्याखाली बुडून राहिले त्यामुळे पिके ही सडलेली होती साठ ते सत्तर टक्के नुकसान असूनही शेतकऱ्यांच्या खात्यात इन्शुरन्स रकमी पेक्षाही कमी रक्कम मिळाल्याने शेतकरी नाराज दिसून येत होते त्यामुळे इन्शुरन्स कंपनी यांना विचारपूस करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचे चंद्रपूर येथील कार्यालय गाठून शेतकऱ्यांच्या खात्यावर का रक्कम कमी आली असेच कुणाला काहीच रक्कम आली नाही याबाबत विचारपूस केली असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचा समाधान समाधानकारक उत्तरे मिळाली नाही असेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकलं नाही तरी पण संबंधित कंपनीने शेतकऱ्याच्या अडीअडचणी समजून शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विम्याची योग्य ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. अभिजीत पावडे , सुधीर नन्नवरे , बंडुभाऊ बोलले , राहुल झुंबाळे, अनिल लोंढे, दशरथ देहरकर , जितु थूल, सचिन डूडुरे , दुर्गेश पावडे , अरविंद मोरे , इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

“” शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख श्री मुकेश भाऊ जिवतोडे तसेच सूर्याभाऊ अडबले , अमितभाऊ निब्रड, तसेच डाखरे गुरुजी यांनी विमा कंपनी कार्यालयाला धडक देऊन कर्मचाऱ्याला शेतकऱ्याच्या व्यथा मांडून कर्मचाऱ्याला खडसावले तेव्हा यांच्या मागणीला न्याय मिळेल असे आवाहन त्यांनी दिले….

Share News

More From Author

भद्रावती तालुक्यात “एच.आय.व्ही/एड्स बद्दल माहीती व जाग्रृती” अभियान संपन्न

मुद्दे मालासह लाखो रुपयांची देशी दारू जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *