✒️मनोहर खिरटकर खाबांडा(Khambada प्रतिनिधि)
खांबडा (दि.29 जून) :- तालुक्यातील ५४ गाव आणि ८उपकेद्राचा भार वाहत असताना कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अगोदरच कर्मचाऱ्यांची कमरतरता तथा औषधाचा तुटवडा असतांना आता या आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेगा पडल्या असल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडले असल्याचा चिंताजनक प्रकार समोर आला आहे.
या आरोग्य केंद्राची नुकतीच डागडुजी झाली खरी पण काम मात्र पुर्ण झाले नाही त्यामुळं कुठे पाणी मुरलं हे कळायला मार्ग नसून येथे दोन डाँक्टरची कायमस्वरूपी निवासी नियुक्ती असताना येथे जे इन्चार्ज अधिकारी आहे.
चंद्रपुरला आरोग्य अधिकारी चंद्रपुरला निवासी असते त्यांचे कडे एकापेक्षा अधिक भार आहे त्यामुळे ते वेळेवर हजर होत नाहि तथा इतर पदाचा भार आहे त्यामुडेच रुग्णांची मोठी हेळसांड होतं आहे, व जे निवासी आरोग्य अधिकारी निवासी रहाते त्यांचेकडे चार्ज नसल्याने त्यांना कोणत्याहि प्रकारच्या उणीवा भरून काढता येत नसल्याने त्यामुळं येथील गरजा पुर्ण होत नसल्याचे बोलले जाते रुग्ण उपचारासाठी आले असता त्यांना आले पावली परतावे लागते.
येथे चपराशी, ओपिडी कर्मचारी व फिल्ड कर्मचारी, तथा औषध संयोजक पद कित्येक दिवसापासुन रिक्त आहे, येथील येणाऱ्या रुग्णाकडून समजते, त्यामुळं कोसरसारच हे आरोग्य केंद्र जिल्हा प्रशासनाने जणू वाऱ्यावर सोडलं असल्याचं विदारक चित्र दिसत आहे येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य काय करताहेत ? )
आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भिंतीना भेगा गेल्या असतांना व आताच कुठं पाऊस सुरू झाला अशातच आरोग्य केंद्रात पाणी बदाबदा झिरपत असतांना येथील लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नेमके आहे तरी कुठे हेच कळत नाही.
दरम्यान खाबांडा येथुन चार किलोमीटर अंतरावर असलेल उपकेन्द्र ५४ गाव ८उपकेन्द्र तरी येथे जाणारा रस्ता कर्मविर विद्यालय ते दवाखाना पर्यत अंतर पाचशे मीटर पुर्णपणे ऊखडलेला आहे याकडे पण कुणाचे लक्ष नसल्याने या परिसरातील जनतेत मोठा संताप व्यक्त होतं आहे.