🔹अभिजित च्या सक्रिय भूमिका व कामामुळे विरोधकांना आतापासून च फुटला आहे घाम( Abhijit’s active role and work has already made the opponents sweat)
✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा(दि.26 जून) :– जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली असून युवा पिढी बदल घडवून आणण्यासाठी या निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करत आहे. तसेच माढेली नागरी जिल्हा परिषद मधून अभिजित कुडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
सध्याची परिस्थिती अशी आहे की वर्तमान जिल्हा परिषद सदस्य समस्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरले. अभिजित कुडे उखर्डा येथे राहत असून सभोवताली असलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्व सामान्य माणसाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करत आहे. गेल्या तीन वर्षांपासून अभिजित सामाजिक कार्यात व राजकारणात सक्रिय आहेत.
स्वतःच्या नेतृत्वाच्या व कामाच्या जोरावर शाखा प्रमुख, तालुका उपाध्यक्ष ते विधानसभा अध्यक्ष पदापर्यंत मजल गाठली आहे. तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे. सर्व सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहे. न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. युवकांना एकत्र घेत दिशा देण्याचे काम करत आहेत.
माढेली रस्त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करत आहे ,23 निवेदन 13 आंदोलन करून त्यांनी रस्त्याची डागडुजी करून घेतली व रस्त्यासाठी त्यांचा संघर्ष अजून सुरू च आहे . रस्त्यातील खड्डय़ात झाडे लावा आंदोलन, भजन आंदोलन, दिवाळीत दिवे लावून आंदोलन, खड्डय़ात झोपून आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, खड्डय़ात स्विमिंग अश्या प्रकारे आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या निराकरण करण्यासाठी धडपड सुरू आहे.
शेतकऱ्यांचे कोणतेही काम असो त्यासाठी अभिजित कोणत्याही परिस्थितीत त्यांचे काम करून देतो कित्येक शेतकऱ्यांचे थकलेले हप्ते, विद्युत पुरवठा खंडित झाला तर प्रशासकीय अधिकारी यांना धारेवर धरत शेतकर्यांच्या प्रश्न सोडविले त्यामुळे नेहमी या संबंध कॉल येत असते व त्यांच्या समस्येचे निराकरण केले जाते.
विहिरीचे पैसे त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा पाठपुरावा करून नसेल ऐकत तर आंदोलनाचा इशारा देत मागण्या पूर्ण केल्या. अपंगाच्या निधी असो त्यांचे प्रश्न असो, निराधार लोकांचा आधार अभिजित झाला आहे. परिसरातील च नाही तर तालुक्यातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेत. राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक कार्य कसे करता येणार या साठी ते प्रयत्नशील असतात. लोकांची सेवा करणे हाच हेतू घेऊन राजकारणात प्रवेश केला असे त्याने सांगितले. लॉक डाऊन मध्ये मजुरांना अन्य धान्य किट वाटप केले .
मुलांचे शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून गावातील वर्ग 1 ते 8 चे 70 विद्यार्थांचे वर्ग निःशुल्क सुरू केले. वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली. My village my vision अंतर्गत वृक्ष लागवड व गावाचा सर्वांगीण विकास आराखडा घेऊन ते काम करत आहेत. कोणताही व्यक्ती त्यांच्या कडे आशेचा किरण म्हणून बघत आहे. नेहमी लोकांच्या प्रश्नांना घेऊन ते काम करत आहेत. लोकांच्या मनात त्यांची वेगळी छाप पडली आहे.
सर्व सामान्य माणसाला. शेतकरी, अपंग व्यक्ती, निराधार यांचा अभिजित ला पाठिंबा आहे. युवकांमध्ये अभिजित चे नेतृत्व डोक्यावर घेतले आहे अनेक युवक त्यांच्या काम करण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्या आगळ्या वेगळ्या प्रकारची आंदोलन करुन ते लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत घेऊन जातात. अधिकाऱ्यांवर त्यांची वचक आहे कारण ते अभ्यासू, कार्यश्रम व्यक्तिमत्त्व आहे. संपूर्ण विधानसभेत युवकांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे.
अभिजित ने निवडणुकीत मैदानात उतरावे अशी सर्व सामान्य माणसाची भावना आहे.कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकूमत गाजवणे नसून, जबाबदारी स्विकारून लोकांना, योग्य दिशा दाखवून, सोबत घेवून प्रगती करणे होय…. याच हेतूने ते लोकांसाठी कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करतात. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून देखील सर्व सामान्य माणसासाठी अभिजित जीवाचे रान करून घेतो.