✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.23 जून) :- ग्रामपंचायत भेंडाळा तालुका वरोरा येथे ग्रामपंचायत भेंडाळ्याची सरपंच नितीन भाऊ खंगार यांच्या सौजन्याने दहावी व बारावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर गं पवार साहेब तसेच प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक खंगार सर तसेच मार्गदर्शन संजय बोधे सर प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन नितीन भाऊ खंगार सरपंच भेंडाळा यांच्या सौजन्याने करण्यात आले होते या शिबिरामध्ये जवळजवळ 70 ते 80 दहावी व बारावीच्या नंतरचे विद्यार्थी उपस्थित होते या शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना बोधे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी आत्मकेंद्रीत बनवून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
स्टुडन्ट मस्त बी नॅरोमाइंडेड असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये जिद्द ठेवून अभ्यासामध्ये वारंवारिता सातत्य चिकाटी या गुणांचा विकास करून आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी तसेच आपल्या समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी खर्ची घातला पाहिजे प्राध्यापक खंगार सर म्हणाले विद्यार्थ्यांनी सध्याच्या युगात आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारून त्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात केला पाहिजे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत भेंडाळाचे सरपंच नितीन भाऊ खंदार आणि त्यांची सर्व ग्रामपंचायत सभासद व गावातील प्रमुख नागरिकांनी ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक जिल्हा परिषद शाळेची मुख्याध्यापक गायकवाड सर भुसारे सर यांचे सहकार्य लाभले.