🔸शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथुन नवजात बाळासह अपहरण करणाऱ्या महिलेस हिंगणघाट येथुन ताब्यात घेण्यात पोलीसांना यश(Police succeeded in arresting the woman who kidnapped the newborn baby from Government Medical College and General Hospital Chandrapur from Hinganghat)
✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.20 जून) :- वरोरा तालुक्यातील माढेळी येथील सौ.मिरा अंकीत धात्रक वय 22 वर्षे या महिलेची दिनांक 17 जुन 2023 रोजी सकाळी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र माढेळी येथे प्रसुती होवून तिला एक मुलगा झाला , परंतु नवजात मुलाचे वजन प्रमाणापेक्षा कमी व अशक्त असल्याने पुढील उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे .
त्याप्रमाणे मिरा धात्रक हिला वार्ड क . 15 मध्ये आणि नवजात बाळाला नवजात शिशु कक्ष क .14 मध्ये वार्ड मध्ये ठेवण्यात आले होते.याच दरम्यान एका महिलेने मिरा धात्रक हिचे बाजुचे बेडवर भरती असल्याचे दर्शवून तिचेशी ओळख व जवळीक निर्माण केली . परंतु सदर महिलेने मिरा धात्रक हिचे बाळ पळविण्याचा आधीच बेत आखुन ठेवला असल्याने मिरा धात्रक ही बाळाला फिडींग करण्याकरीता नवजात शिशु कक्षात जात असतांना तिचे सोबत जाणे.
मिरा हिची काळजी घेणे अशी कामे करीत असल्याने रुग्णालयात भरती असलेल्या इतर रुग्ण महिलांप्रमाणेच रुग्णालयाचे स्टॉफला देखील सदर महिला सौ.मिरा धात्रक हिचेसोबतच काळजीवाहु असल्याचा विश्वास निर्माण झाला आणि याचाच फायदा सदर महिलेने घेण्याचे ठरविले . आणि आज दिनांक 20 जुन 2023 चे सकाळी 05:30 ते 06:00 वाजता दरम्यान सौ.मिरा धात्रक हिचे बाळ रडत असल्याने त्यास सौ.मिरा धात्रक हिचेकडे देण्याकरीता ताब्यात घेवुन मोठ्या शिताफीने रुग्णालयातुन बाळासह पोबारा केला. त्यानंतर सदर बाब कर्तव्यावरील स्टॉफ नर्सचे लक्षात येताच त्यांनी बाळा बाबत शोध घेतला परंतु रुग्णालयात बाळ व सदर महिला दिसुन न आल्याने याबाबत तात्काळ पोलीसांना सुचना देण्यात आली असता चंद्रपूर शहर चे पोलीस अधिकारी व अंमलदार रुग्णालयात पोहचुन प्राथमिक चौकशी करुन सदर बाब वरिष्ठांना कळविली.
पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिह परदेशी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु , प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा.पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपानी यांचे मार्गदर्शनाखाली सदर महिलेचे शोध मोहीमे दरम्यान विविध तपास पथकांमार्फत कौशल्यपुर्ण तपास करण्यात आला.या पथकांकडून केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान सदर महिला नामे झेबा सुभान शेख वय 31 वर्ष रा.डांगरीपुरा हिंगणघाट जिला-वर्धा हिला ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल विचारणा केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन तिचे ताब्यातील चार दिवसीय बाळास सुखरुप तिचे आईचे सुपुर्द करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिह परदेशी,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा.पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांचे मार्गदर्शनाखाली आणि वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन,अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवळे यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोस्टे चे पोलीस निरीक्षक श्री सतिश राजपुत,सपोनि मंगेश भोंगळे,पोउपनि शरीफ शेख व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार .
पोस्टे.चिमुर येथील पोनि श्री मनोज गभणे,पोउपनि सुशिल सोनवणे व स्टॉफ,पोस्टे वरोरा येथील पोउपनि मित्तरवार व स्टॉफ तसेच वर्धा जिल्हयाचे सहा.पोलीस सहायक श्री विनीत घागे,श्री संदीप कापडे,पोनि कैलास पुंडकर व स्टॉफ तसेच महामार्ग पोलीस पोउपनि श्री विठठल मोरे व स्टॉफ आणि चंद्रपूर जिल्हा सायबर आणि वर्धा जिल्हा वर्धा सायबर पोलीस स्टेशन सह सीआयडी पोलीस हेडक्वार्टर पटना ( बिहार ) येथील पोलीस अंमलदार मो.शोहेब हुसैन यांनी केली असुन चंद्रपूर बस स्थानक येथील कंट्रोलर श्री मंगेश डांगे यांनी महिलेचा शोध घेण्यासाठी तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर चे संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांनी बाळास सुखरुप आण्याकरीता सर्वसुविधा युक्त अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे .
एकंदरीत , जिल्हयात एक चार दिवसाचे नवजात बाळाच्या अपहरण प्रकरणात चंद्रपूर जिल्हा पोलीस आणि वर्धा जिल्हा पोलीसांनी एकमेकांशी योग्य समन्वय साधुन मिळत असलेल्या प्रत्येक पुरव्याची तात्काळ शहानिशा करुन काही तासाचे आंत अपह्त नवजात बाळासह अपहरण करणाऱ्या महिलेस ताब्यात घेवुन बाळास सुखरुप तिचे आईचे स्वाधिन करण्यास यश प्राप्त केले आहे.