चंद्रपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन :- मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार Successful organization of Women’s FIDE Rating Chess Tournament for the first time in the history of Chandrapur :- Hon.Amdar Kishorebhau Jorgewar

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.19 जून) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य महिला फीडे रेटिंग बुद्धिबळ चॅम्पियन चंद्रपूर येथे दिनांक 16 जून ते 18 जून 2023 असे तीन दिवसीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 16 जून रोज शुक्रवार ला मोठ्या थाटात संपन्न झाले.

स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रतील एकूण 44 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा 8 राऊंड मधे पार पडली.18 जून ला पुरस्कार वितरण करण्यात आले.

पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार प्रामुख्याने उपस्थित होते.चंद्रपूर जिल्हा मधे बुद्धिबळ खेळाचे पोषक वातावरण निर्माण करून राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा चे आयोजन करावे.अशी भूमिका आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केली.

प्रमुख अतिथी म्हणून मा. मदर अली , मा.प्रशांत विघ्नेश्वर,मा.संग्राम शिंदे साहेब,अध्यक्ष मा. आश्विन मुसळे, मुख्य ऑर्बिटर मा. सप्नील बनसोड , ऑर्बिटर कुमारी गायत्री पाणबुडे, श्री.कुमार कनकम, मा. नरेन्द्र कन्नाके आवर्जुन उपस्थित होते. स्पर्धक मधे जळगाव ची सानिया तडवी हिने 7 गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला,औरंगाबाद ची श्रृती काळे हिने साडे सहा गुण घेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.मुंबई ची युती पटेल हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर कोल्हापूर ची.शर्वरी काबनुरकर हिने चतुर्थ क्रमांक पटकविला.

      ही स्पर्धा निवड स्पर्धा होती. स्पर्धा मधून एकूण 4 स्पर्धकाची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात आली आहे . स्पर्धा मधे एकूण 72 हजार रुपयाचे पुरस्कार रक्कम ठेवलेली होती. ही रक्कम 10 स्पर्धकांना पुरस्कार म्हणून वाटून देण्यात आली. त्याच बरोबर त्यांना सन्मान चिन्ह सुद्घा प्रदान करण्यात आले.

     पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष मा.आमदार किशोरभाऊ जोरगेवार साहेब यांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.सर्व मान्यवर ,खेळाडू, उपस्थित पालक यांचे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.यशस्वी नियोजन केल्या बदल सर्व पालक,खेळाडू यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.