बळीराजाची फसगत खपवून घेणार नाही : रविंद्र शिंदे Will not tolerate Baliraja’s deception: Ravindra Shinde

🔹उगवण क्षमता नसलेली व पिकांवर रोगांचा तथा बोंडअळी सारख्या कीटकांचा प्रादुर्भाव करणारी बियाणे कृषीकेंद्र चालकांनी विकू नये; जाहीर आवाहन(The agriculturists should not sell seeds that are not germinating and are susceptible to diseases and pests like bollworms; Public appeal)

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी)

भद्रावती (दि.16 जून) :- शेती हा ग्रामीण जीवनाचा आधार आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून यावर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे बी-बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, त्यांना योग्य उगवण क्षमतेची व पिकांवर रोगांचा तथा कीटकांचा प्रादुर्भाव होवू नये, अशीच बियाणे उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांची फसगत झाल्यास ते कदापी खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा – भद्रावती विधानसभा , खते व पेरणी साठी लागणारे साहित्य शेतकरी खरेदी करीत आहे.

दरवर्षी काही शेतकऱ्यांना असे अनुभव येतात की खरेदी केलेले बियाणे हे उगवतच नाही. किंवा बोंडअळी प्रतिकारक्षम नसल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव करणारे परराज्यातील आरआरबीटी किंवा चोरबीटी नावाने प्रचलित असलेल्या कपाशीची लागवडीसाठी बंदी असतानाही शेतात लागवड होते. यासाठी कृषी केंद्र चालक जवाबदार आहेत. त्यांनी असे उगवण क्षमता नसलेले तथा बंदी असलेले परराज्यातील आरआरबीटी किंवा चोरबीटीची कृषी केंद्रातून विक्री करू नये व शेतकऱ्यांची फसगत करू नये, असे आवाहन रविंद्र शिंदे तथा अन्नदाता एकता मंचचे अनुप खुटेमाटे यांनी केले आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या चोरबिटीचा साठा दाखल झाला आहे. परराज्यातून बाजारात अनधिकृतपणे आरआरबीटी किंवा चोर बीटी नावाने प्रचलित असलेल्या कपाशीला या लागवडीसाठी बंदी आहे. ही बीटी कपाशी बोंडआळी प्रतिकारक्षम नसल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. छुप्या मार्गाने अनेक ठिकाणांहून आरआरबीटी किंवा चोर बीटीची विक्री सुरू आहे. कृषी विभागाच्या पथकाने अशा काही कृषी केंद्रावर कारवाई देखील केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी या अनधिकृत बीटीची लागवड करु नये, व कृषी केंद्र चालकाने कृषी केंद्रात असे बियाणे ठेवू नये, कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी केंद्रांची झडती घ्यावी व पाळत ठेवावी, असे जाहीर आवाहन रविंद्र शिंदे तथा अन्नदाता एकता मंचचे अनुप खुटेमाटे यांनी केले आहे. अन्यथा शेतकऱ्यांची फसगत झाल्यास ते खपवून घेतल्या जाणार नसल्याचेही रविंद्र शिंदे म्हणाले.