✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.10 जून) :- पोलिस स्टेशन शेगाव बू तर्फे पोलिस अधीक्षक परदेसी सर यांच्या मार्गदर्शनात नेहमीच जनजागृती , स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी मार्गदर्शन चे कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस स्टेशन शेगाव बू, पोलिस पाटील शेगाव बू, शांतता कमिटी शेगाव बू तर्फे पोलिस स्टेशन शेगाव बू हद्दीतील शाळेतील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक इजी. संजय मगर ( ब्रम्हपुरी ) यांनी 10वी 12वी नंतर काय शिक्षण घेतले पाहिजे या वर विस्तृत माहिती दिली. सोबतच शालेय जीवन जगत असताना आपण आपले सामाजिक भान ठेवून शिक्षण घेऊन ते शिक्षण समजाच्या उपयोगी आले पाहिजे.
तसेच प्रा. नगराळे सर ( शंकरपुर) यांनी विद्यार्थी यांनी आपल्या सब कॉन्सेस माईंड ला जागृत करून स्वतःची सोबतच देशाची प्रगती केली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. संजय बोधे सर यांनी विद्यार्थी शिकून महापुरुषांचे स्वापणातील भारत बनवण्यात योगदान दिले पाहिजे असे मत मांडले. ठाणेदार मेश्राम साहेब यांनी बाबा साहेब आंबेडकर यांचे उदाहरण देऊन विद्यार्थी यांनी एक उद्दिष्ट घेऊन अभ्यास केला तर ते जीवनात नक्की यशवी होईल असे मत मांडले.
पोलिस स्टेशन शेगाव बू हद्दीतील त्यांचे शाळेतून 10वी मध्ये प्रथम क्रमांक पतकवणारे समीक्षा बावणे चारगाव खुर्द, प्राजक्ता कोकुडे शेगाव बुद्रुक , रूनाली तीतरे बोथली, अंगत शेंडे वहांनगाव, ईशांत देहारे सावरी, प्रणाली बरडे लोणार, वैष्णवी जांबुळे चारगाव बू, पियुश येरमे अर्जुनी, भावना बावणे भटाळा.
समीक्षा मोहारे साखरा, स्वरांजली चौधरी आष्टा, रिया तुमसरे खेमजई, राखी कुंदनकर शेगाव बू, यांना mpsc तयारी करीता उपयुक्त तात्या चा ठोकळा आणि 10वी मध्ये दुसरा क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थी धारणा पोटे चारगाव खुर्द , नागेश राऊत वहानगाव, आदित्य सुर्यवंशी माकोणा, प्रेरणा चौधरी अल्फर, सानिया गरमडे चारगाव बू, चेतन हंनवते अर्जुनी, प्रणिता बरडे भाटाळा, रुचिका उमरे साखरा, स्नेहा लोनबले आष्टा, सजल जिवतोडे शेगाव बू, समीक्षा चिकटे खेमजई, रोहित शर्मा शेगाव बू यांना mpsc तयारी करीता अंकगणित , बुध्दीमत्ता चे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच वर्ग 12 वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे प्राची सावसाकडे वहांनगाव, करणं ढोणे चारर्गाव खुर्द, करीना वरवडे शेगाव बू आणि आपल्या शाळेतून वर्ग 12वी मध्ये दुसरा क्रमांक पतकवणारे प्रणाली कंनाके बोथली, स्वाती गर्माळे चारर्गाव बू, हिमांशू चौधरी चारगाव खुर्द, अयान शेख शेगाव बू यांचा एमपीएससी साठी उपयुक्त तात्या चा ठोकळा हे पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. अश्या एकुण 32 विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
सोबतच पोलिस स्टेशन शेगाव बू मध्ये मे महिन्यात उत्कृष्ट काम करणारे नाद्रा येथील पुरुष पोलिस पाटील अविनाश चिंचोळकर आणि बेंबडा येथील महिला पोलिस पाटील सौ मनीषा सोनवणे यांना पुष्पगुच्छ, सन्मान पत्र आणि शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
तसेच पोलिस स्टेशन शेगाव बू येथील चांगले काम करणारे सहायक फौजदार पडोळे साहेब आणि पोलिस अमलदार रमेश पाटील यांना पुष्पगुच्छ , सन्मान पत्र आणि शिल्ड देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन पोलिस पाटील अविनाश चिंचोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शांतता कमिती शेगाव बू चे राकेश बोंगुलवार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या करीता पोलिस स्टेशन शेगाव बू चे अमलदार, पोलिस पाटील, शांतता कमिटी शेगाव बू आणि बोथली येथील शिक्षक बोधे सर यांनी विशेष मेहनत घेतली.