✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.3 जून) :- सोनापूर फाट्या लगत पाटण मार्गे गडचांदुर कडे येणाऱ्या भरधाव हायवा वाहन क्र. MH34BG9975 ने समोरून येणाऱ्या पाळीव प्राणी बैलं – गाई आणि वासरू च्या कळपाला जोरदार धडक दिल्याने तयात दोन बैलं, ४ गाई, २ वासारूचा जागीच मृत्यू झाला. व ४ बैलं जखमी झाले.
घटनास्थळी शेतकऱ्यांमार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.विशेष म्हणजे, उतारावरून डिझेल वाचविण्याच्या नादात वाहन नुट्रल करून चालविल्याने घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या घटनेत नुकसानग्रस्त आशिष मडावी यांचा एक बैल, राजीव गेडाम यांची १ गाय व सागर कन्नाके यांची २ गाय व १ वासरू, विलास जगरवार १ गोरा , धर्मा किन्नाके, नागू वेडमे, विशेषराव अत्राम, विठ्ठल अचालवार यांच्या मालकीचे जनावरे रस्त्यालगत चराई करीत असतांना सुसाट वेगाने हायवाने जनावरांना चिरडले.
यात ८ जनावरांचा जागीच मृत्यू झाला व अन्य चार जनावरे जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला व रस्ता रोखून नुकसान भरपाई ची मागणी केली. तसेच या घटनेवर कार्यवाही करून शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत लवकर मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. डिझेल वाचविण्याच्या नादात हायवा चालकाने वाहन नूत्रल केल्याने जनावरे चिरडली गेली असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.