✒️शिरीष उगे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.29 एप्रिल) :- स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभाग व सर्वांना समान संधी या विभागाच्या वतीने रक्तदानाचे महत्त्व या विषयावर डॉ. जयवंत काकडे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. काकडे यांनी सांगितले की, रक्ताला कुठलीही जात, धर्म नसते. रक्तदान हे धर्मनिरपेक्ष दान आहे. रक्तदानाने गरजू रुग्णाचा जीव वाचविता येतो. दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान
म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित रक्तदान करावे व राष्ट्र घडणीच्या या योगदानात आपलेही योगदान द्यावे. रक्त हे जीवनदान आहे हा विचार कायम मनात ठेवावा. या कार्यक्रमाचे, प्रास्तविक डॉ.रमेश पारेलवार, संचालन आणि आभार डॉ. यशवंत घुमे यांनी केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.