कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सूटका Exemption of 19 animals taken for slaughter

Share News

🔹पडोली पोलिसांची कारवाई : दोघांना अटक 

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.21 एप्रिल) :-

        आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सुटका करुन पडोली पोलिसांनी दोघांना अटक केली. गुरुवारी मध्यरात्री साखरवाही टोल नाक्यावर नाकाबंदी करुन पोलिसांनी ही कारवाई केली. अब्दुल अजीज अब्दुल रऊफ (२७), जुबेर अहमद गुलाब रसूल कुरेशी (४०) दोघेही रा. गडचांदूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर मुजममील खॉ वाहाब खॉ (२४) रा. गडचांदूर हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लगेच साखरवाही टोल नाका येथे नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन आयचर क्र. एमएच 27, बी एक्स 5838 येताच पोलिसांनी वाहन थांबविले.

वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले. पोलिसांनी वाहनचालक व वाहक या दोघांना अटक केली तर सोबतच एकजण पोलिसांना पाहून फरार झाला. पोलिसांनी जनावरांसह दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात देवाजी निखाडे, विनोद वनकर, किशोर वाकाटे, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पकंज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.

Share News

More From Author

वाढत्या तापमानात उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा Protect yourself from heatstroke in rising temperatures

आदिवासी प्रशिक्षणार्थींना स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन Guidance to tribal trainees regarding competitive examination

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *