सालोरी , येंन्सा ,मजरा , येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

Share News

✒️ग्यानीवंत गेडाम(वरोरा प्रतिनिधी)

 

वरोरा(दि.9डिसेंबर):- तालुक्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा विविध विकास कामाचा धडाका चालू असून त्याच अनुषंगाने आज जवळपास दहा गावात विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम करण्यात आहे. याचाच एक भाग म्हणून सालोरी येन्सा ब्लॅक मजरा येथे खनिज विकास निधीतून ग्रामपंचायत कार्यालय ते रमेश बारेकर यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे लोकार्पण सोहळा क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी गावकऱ्यातर्फे ग्रामपंचायत सालोरी येन्सा ब्लॅक करिता नवीन ग्रामपंचायत भवन, बी एस इस्पात कंपनीच्या धुरामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यात यावी, कंपनी स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, स्मशानभूमीकरिता सभागृह व बाल कंपाऊंड देण्यात यावे इत्यादी विविध मागण्याचे निवेदन आमदार प्रतिमा ताई धानोरकर यांना देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने आमदार प्रतिभाताई धानोरकर, बि डी ओ वरोरा, प्रमोद भाऊ मगरे, राजूभाऊ चिकटे, सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमुख तोडासे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सारिका धाबेकर, ग्रामसेवक एकनाथ चापले, ग्रामपंचायत सदस्य सर्वस्वी राजेंद्र बोढे, प्रतिभा मानकर,हर्षद निब्रड, सामाजिक कार्यकर्ते ग्यानीवंत गेडाम, धनराज वांढरे, कैलास तोडासे, प्रकाश झाडे व गावातील बहुसंख्य नागरिकांचे व महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती …

Share News

More From Author

उखर्डां येथे जागतिक माती दिवस साजरा, शेतकऱ्यांना मार्गदर्शन ..

सावरी येथे आरोग्य अधिकारी नसल्याने आरोग्य यंत्रणा कोडमोडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *